Viral Video Shows Funny Kho-Kho Game : एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळताना तेथील नियमसुद्धा पाळावे लागतात, पण जेव्हा आपण चाळीत, टेरेस किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा गावात खेळ खेळतो, तेव्हा आपणच परीक्षक आणि आपणच खेळाडू असतो; त्यामुळे इथे कोणी नियम तयार केले तरीही ते पाळलेच जातील हे मनात धरून चालणेच चुकीचे असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. यामध्ये गावाकडे खो-खो हा खेळ रंगलेला दिसतो आहे, जो पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत (Video)तुम्ही पाहू शकता, गावातील मंडळी खो-खो खेळ खेळताना दिसत आहेत. अगदी लहान मुले ते महिलांपर्यंत अनेक जण यात सहभागी झाले आहेत. पुरुष मंडळी प्रेक्षक म्हणून हा खेळ पाहत असतात. खेळाला सुरुवात होते आणि सगळे एकमेकांना खो देत डाव असणाऱ्या महिलेला जीव तोडून पकडण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यात खेळाडूंमधील एक मुलगा एका आजीला खो देतो. त्यानंतर काय घडते हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

एखादे जुने भांडण आठवले असेल बहुतेक…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, गावात खो-खो हा खेळ रंगलेला दिसतो आहे. एका महिलेला आऊट करण्यासाठी सगळे गावकरी सज्ज झाले आहेत. जेव्हा गावकऱ्यांमधील एका आजीला मुलगा खो देतो, तेव्हा मात्र खेळाला एक वेगळेच वळण येते. ज्या महिलेला आऊट करायचे असते, तिच्या मागे ही आजी इतक्या जोरात धावत जाते की, दुसरी महिला घाबरून खेळाचे नियमच विसरते आणि दोघी अगदी लांब पळत सुटतात आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @trendruiners या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘नियम! हे काय असते’ अशी मजेशीर कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरीदेखील हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. काही जणांना हा खेळ खेळण्यासाठी गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, तर अनेक जण त्या दोघींना एखादे जुने भांडण आठवले असेल बहुतेक’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.