Video Shows Man Made PowerPoint Slides For His Pre Wedding Speech : सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. खूप वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेव्हा एखादे जोडपे लग्नबंधनात अडकते, तेव्हा त्यांच्यासाठी लग्नापूर्वीचा प्रत्येक कार्यक्रम खास असतो. मग तो साखरपुडा, हळद, मेंदी किंवा संगीत असो. यादरम्यान नवऱ्याने आपल्यासाठी डान्स करावा, एखादे गाणे गाऊन दाखवावे किंवा एखादे रोमँटिक स्पीच द्यावे हीच खरे तर प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. पण, आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ (Video) पाहून तुम्ही तर थक्कच होऊन जाल…

राहुल आणि पूजा यांच्या लग्नापूर्वीच्या एका खास कार्यक्रमाला अनोखी जोड देण्यात आली होती. व्हिडीओच्या (Video) सुरुवातीला नवरदेव राहुलने, “पुढील ४० वर्षं फक्त ऐकण्यात घालवण्यापूर्वी मला काहीतरी बोलायचं आहे”, असे म्हटल्यानंतर मागे मोठ्या स्क्रीनवर पहिली स्लाइड येते. राहुल क्रीमच्या एका छोट्या बॉक्सकडे बोट दाखवून विचारतो, “हे काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का?” प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मंडळींनी ओळखेपर्यंत तो स्वतःच उत्तर देतो आणि म्हणतो, “पूजाला भेटण्यापूर्वी माझी स्किनकेअरची दिनचर्या”. त्यानंतर पुढची स्लाईड येते आणि पूजा आल्यानंतर ‘मॉइश्चराइजर, सनस्क्रीन, बॉडी वॉश, फेस वॉश, लीप बाम’ अशी माझी स्किनकेअरची दिनचर्या झाली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

बायकोला वाटले मी रोमँटिक भाषण देईन…

जोडप्यांमध्ये अनेकदा भांडणे ही प्रशंसा न करणे किंवा तो माझ्याशी मन मोकळे करून बोलतच नाही या कारणांवरून होत असतात. पण, आज आपल्या जोडीदाराला नि:शब्द करण्यासाठी एका नवरदेवाने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन (PPT) तयार करून, ते नवरीला मजेशीरपणे ‘रोस्ट’ केले आहे. जोडीदार पूजा आल्यानंतर त्याच्या आयुष्यात कसे बदल झाले यासाठी धन्यवाद म्हणतानाच त्याने कोणतेही रोमँटिक स्पीच न देता, चक्क पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन (PPT) तयार करून सादर केले आहे आणि सगळ्यांना पोट धरून हसवले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणरा हा व्हिडीओ (Video) @rahulbhagtani09 आणि @glowgeous_skin या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘माझ्या बायकोला वाटले मी रोमँटिक भाषण देईन. पण, असे झाले, की ते एक फुल-ऑन रोस्ट सेशन होते. ‘लग्नापूर्वी- साबण, पाणी आणि निव्याची क्रीम. पण, लग्नानंतर १० स्टेप्स स्किनकेअर रुटीन’, अशी मजेशीर कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून एका तरुणीने, जर माझ्या नवऱ्याने असे केले नाही, तर मी लग्नमंडपातून बाहेर पडेन आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.

Story img Loader