Video Passenger Bought A Bhel For The Beggar : प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःखं ये-जा करीतच असतात. त्यामुळे कोणताही व्यक्ती पूर्णपणे सुखी राहत नाही. कोणती ना कोणती कमतरता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात नक्कीच असते. पण, या सगळ्यांमधूनसुद्धा जो स्वतःला आणि दुसऱ्याला आनंदी ठेवतो, तोच खरा माणूस असतो. तर आज याचे उदाहरण व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला प्रवाशाने नकळत मदत केली आहे, जे पाहून तुमचे मन नक्कीच भरून येईल.
ट्रेन प्रवासात पोटा-पाण्यासाठी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेक जण भीक मागताना दिसतात. काही जण अगदी पाया वगैरे पडून समोरच्याने पैसे किंवा खायला देईपर्यंत विनवणी करत असतात; तर अनेक जण एकदा-दोनदा मागून गप्प बसतात. पण, आजच्या व्हायरल व्हिडीओत काहीतरी वेगळेच पाहायला मिळाले आहे. एक भीक मागणारी व्यक्ती उपाशीपोटी सीटवर बसल्याचे दिसत आहे. यादरम्यान एक फेरीवाला तिथे येतो. नंतर काय घडते ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
देव तुमचं भलं करो
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, ट्रेन प्रवासादरम्यान एक भीक मागणारा माणूस सीटवर बसला आहे. यादरम्यान तिथे एक फेरीवाला येतो. ट्रेनमधून प्रवास करणारा एक प्रवासी फेरीवाल्याला भेळ बनवण्यास सांगतो. फेरीवाला भेळ बनवतो. भेळ बनवल्यानंतर प्रवासी त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवतो आणि त्याला देण्यास सांगतो. हे पाहून ती व्यक्तीसुद्धा भारावून जाते आणि भेळ खाण्यास सुरुवात करते, जे पाहून त्या प्रवाशाचे तुम्हालाही कौतुक वाटेल एवढे नक्की…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @realistictrolls या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून “मी त्या माणसाबद्दल विचार करीत होतो. तो कुठे राहतो आणि कसा राहतो”, “मला फक्त एवढं श्रीमंत व्हायचे आहे”, “देव तुमचं भलं करो”, “त्या माणसाची अशी हालत का झाली असेल” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.