Video Shows Man performed A Poem For Lovers : कविता ही नेहमीच प्रेरणादायी असते. कवितांमधून मिळणारा आनंद, समाधान, व्यक्त होणाऱ्या भावना नकळत एखाद्यापर्यंत पोहचवल्या जातात. तसेच आजच्या काळात ही गोष्ट खूप आवश्यक झाली आहे. एखादे दुःख किंवा एखादी भावना जरी व्यक्त करायची असेल तर ती कवितेच्या माध्यमातून अगदी सहज करता येते. तर इन्स्टाग्राम युजर गणेश घुमरे हा तरुण अनेक कविता सादर करत असतो. त्याने सोशल मीडियावर त्याच्या अनेक कविता सादर केल्या आहेत; तर आज त्याने कामात व्यस्त असणाऱ्या प्रियकर, प्रेयसीसाठी एक खास कविता सादर केली आहे आणि त्यात ‘तू येणार असशील तर आजच ये, उद्या मला वेळ नसेल’ हे मोलाचे शब्द हायलाईट केले आहेत.

तर कवितेची सुरुवात (Video) तरुणाने ‘तू येणार असशील तर आजच ये, उद्या मला वेळ नसेल, उद्या ९ ते ५ च्या जॉबमध्ये अडकून पडेन, उद्या हा कृष्णा आजच्याइतका खट्याळ नसेल, म्हणून तू येणार असशील तर आजच ये, उद्या मला वेळ नसेल. उद्या असेल नसेल चांदण्या आभाळावर, उद्या असेल नसेल मी आयुष्याच्या, आयुष्य माझ्या तालावर, उद्या जबाबदारीत पाय गुंतून पडेल, उद्या मन आजच्या इतके चपळ नसेल. म्हणून म्हणतो तू येणार असशील तर आत्ताच ये, उद्या मला वेळ नसेल.’ एकदा तुम्हीसुद्धा ऐका तरुणाने सादर केलेली ही सुंदर कविता.

व्हिडीओ नक्की बघा…

उद्या माझ्यातल्या वसंताला उसंत नसेल, पक्ष्यांना विहार करण्या माझ्यामध्ये आसमंत नसेल, उद्या समज येऊन ठेपेल माझ्या दारावर, उद्या आजच्या इतका मी अवखळ नसेल, उद्या माझ्यामध्येच माझी वर्दळ नसेल, डबक्यासारखा थांबून पडेल, वाहणाऱ्या नदीसारखा खळखळ नसेल. म्हणून म्हणतो तू येणार अशील तर आजच ये, उद्या मला वेळ नसेल. धन्यवाद!; असे म्हणून तरुण आपली कविता संपवतो. व्हायरल व्हिडीओतील (Video) तरुणाच्या कवितेचे एकेक शब्द ऐकून तुम्हालाही तुमच्या प्रियकर आणि प्रेयसीची आठवण येईल एवढे तर नक्की.

एकदम अचूक शब्द रचना…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @ganeshghumare_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘उद्या आहे चंद्र ग्रहण आज मला तुझा म्हण’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी तर कविता ऐकून तरुणाच्या प्रेमात पडले आहेत आणि ‘तुझे शब्द, खूपचं सुंदर, खरचं रे… ‘आत्ता’, ‘आज’ या वेळाला किती महत्त्व आहे नाही का, एकदम अचूक शब्दरचना’ अशा कौतुकास्पद तर ‘आईने लय काम लावलेत पुढच्या रविवारी बघू बोलते’ आदी मजेशीर कमेंट करतानासुद्धा दिसेल आहेत.

Story img Loader