Video Shows Man Decorate His Car With Coins : प्रत्येकाला आपले वाहन प्रिय असते. रिक्षा, ट्रक, बाईक, चारचाकी किंवा इतर कोणतेही वाहन असो, आकर्षक स्टीकर्सचा उपयोग करून काही वाहनमालक स्वत:च्या गाडीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून घेतात. तसेच अशी काही देखणी सजावट करतात की, अनेक जण त्याकडे नकळतपणे आकर्षित होतात. पण, तुम्ही तुमच्या वाहनांवर किती खर्च करू शकाल याचा काही अंदाज लावू शकता का? नाही… तर आज खर्च सोडाच, एका माणसाने तर चक्क पैशांनी स्वतःची गाडी सजवून घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ (Video) राजस्थानचा आहे. व्हिडीओत भरउन्हात एक कार उभी करण्यात आली आहे. कारण राजस्थानमधील एका व्यक्तीने आपली कार एक रुपयाच्या नाण्यांनी सजवली आहे. नाण्यांनी सजवलेली कार सूर्यप्रकाशात चमकत होती. पण, या खास वाहनाच्या मालकाची कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नसली तरीही राजस्थानमधील या माणसाच्या संकल्पनेने सगळ्यांना थक्क करून सोडले आहे. नाण्यांनी सजवलेली एक रुपयांची कार व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

अनेकदा दुचाकी किंवा खास करून चारचाकी चालक गाड्यांवर कुटुंबातील लहान मुलांची नावे किंवा काही मजेशीर स्टीकर्ससुद्धा बसवून घेतात. पण, या कारचालकाने तर सगळ्यांना मागे टाकत चक्क खऱ्या-खुऱ्या नाण्यांनी स्वतःची कार सजवून घेतली आहे. गाडीच्या बाहेरच्या पार्ट्सवर पांढरी पट्टी लावून, अगदी मोजमाप करून, कुठेही नाणे मागे-पुढे होणार नाही याची काळजी घेऊन अगदी व्यवस्थित नाणी बसवून घेतली आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की…

लहान मुलांना या गाडीपासून लांब ठेवा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @experiment_king या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पैशांची कार’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. काही जण म्हणतायत, “लहान मुलांना या गाडीपासून लांब ठेवा”, “केवढे पैसे आहेत हे, नाणी लावून गाडीला सपोर्ट दिला जातो आहे”, “आमच्या गावातून एक राउंड मारून ये फक्त” आदी अनेक मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसून येत आहेत.