Viral Video : थंडी सुरू झाली की, आपल्यातील अनेक जण कामावर जाताना जॅकेट, शाल किंवा स्वेटर घालून जातात किंवा घरातही चप्पल किंवा सॉक्स घालून किंवा अंगावर चादर घेऊन बसतात; जेणेकरून थंडी जाणवणार नाही. अनेक बसचालक, रिक्षाचालकसुद्धा थंडी जाणवणार नाही या दृष्टिकोनाने तसेच कपडे वापरतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत आहे की, त्यामध्ये एका रिक्षाचालकाने मजेशीर गोष्ट केली आहे.
व्हायरल व्हिडीओ पुण्याचा आहे. एक अनोळखी व्यक्ती त्याच्या गाडीवरून प्रवास करीत असते. यादरम्यान त्याला एक रिक्षाचालक दिसतो. या रिक्षाचालकाने थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी जुगाड केल्याचे दिसते आहे. हा रिक्षाचालक स्वेटर, जॅकेट किंवा शाल घेऊन नाही, तर चादर अंगावर गुंडाळून बसला आहे. फक्त चादरच नाही, तर त्याने आणखीन एक गोष्ट केली आहे. नक्की रिक्षाचालकाने काय केले आहे ते व्हायरल व्हिडीओतून ( Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
पुणे तिथे काय उणे
‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पु. ल. देशपांडेंच्या कथाकथनापासून ते चारचौघांतील गप्पांमधूनही आपण पुण्यामधील अनेक गमतीशीर किस्से ऐकले असतीलच. पुन्हा आज त्याचेच प्रात्यक्षिक पाहायला मिळाले आहे. सहसा घरून काम करताना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जुगाड म्हणून आपण अंगावर चादर घेऊन बसतो; जेणेकरून थंडी जाणवणार नाही. पण, हा रिक्षाचालक मांडी घालून रिक्षात बसला आहे आणि त्याने पूर्ण अंगावर चादर गुंडाळून घेतली आहे.
चादर गुंडाळूनच तो रिक्षा चालवताना दिसत आहे. हे पाहून एका अनोळखी व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून, तो सोशल मीडियावर @PuneriSpeaks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘पुण्याची थंडी’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच ‘पुणे तिथे काय उणे’ असा मजकूरसुद्धा व्हिडीओवर लिहिला आहे. दुकानावर किंवा घराबाहेर लावलेल्या मजेशीर पाट्या, तसेच ट्रक, रिक्षामागे लावलेली पाटीसुद्धा व्हायरल होत असते. पण, आज हा अनोखा जुगाड व्हायरल झाला आहे.