Viral Video Show sofa Made From Broken Chairs : कच‍ऱ्याचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय हा सगळ्यात बेस्ट आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कच‍ऱ्यात टाकून दिल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचा शक्य तितका पुनर्वापर केला गेला पाहिजे. प्लास्टिकच्या बाटल्या, जुन्या सीडी, आइस्क्रीम स्टिक्स, जुने टी-शर्ट, जुन्या जीन्स आदी अनेक गोष्टींचा वापर आपण सुशोभनाच्या वस्तू तयार करण्यासाठीही करू शकतो. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे; पण त्यामध्ये चक्क खुर्च्यांपासून सोफा बनविण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, व्हिडीओच्या सुरुवातीला दोन खुर्च्या दिसत आहेत. दोन्ही खुर्च्यांच्या एकेका बाजूचे, हात टेकवण्याचे भाग कापून काढण्यात आले आहेत. त्यानंतर मोठमोठे पुठ्ठे सोफ्याच्या भागाप्रमाणे कापून, ते त्या जागी चिकटवण्यात आले आहेत. त्यानंतर सोफा थोडा मजबूत होण्यासाठी त्यावर आणखीन एक (थर) लेअर बसवण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओतून एकदा पाहाच जुगाड करून बनवलेला हा सोफा.

wheat flour get moldy if it is stored for a long
गव्हाचे पीठ जास्त दिवस साठवल्यास किडे होतात? ‘या’ सोप्या उपायांनी जास्त दिवस टिकू शकेल पीठ
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
car maintenance tips
पावसाळा संपल्यानंतर अशी घ्या कारची विशेष काळजी; ‘या’ पाच महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या
cat saves from pack of 4 dogs
Video : मांजरीचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीची झुंज; चक्क चार श्वानांना लावलं पळवून!
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?

हेही वाचा…“म्हणूनच मला मुंबई आवडते…” बॅगमधून डोकावणाऱ्या मिन्नीला पाहून प्रवासी झाले खुश ; VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

व्हिडीओ नक्की बघा…

तुटलेल्या खुर्च्यांचा पुनर्वापर :

व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, खुर्चीचे काही भाग कापून, त्यांना बाजूबाजूला ठेवून, त्याच्यावर पुठ्ठे लावण्यात आले आहेत. सोफ्याच्या रचनेप्रमाणे पुठ्ठ्यांचे तुकडे करून घेतले आहेत आणि मग ते सोफ्यावर चिकटवण्यात आले आहेत. त्यानंतर स्पंजचा लेअर त्यावर लावण्यात आला आहे आणि सुंदर, स्वछ कव्हर घालून सोफा तयार करण्यात आला आहे. दोन खुर्च्यांपासून सोफा बनवता येईल, अशी कल्पनासुद्धा तुम्ही कधी केली नसेल, जी या तरुणांनी व्हिडीओत करून दाखवली आहे. त्यांची ही कलाकृती पाहून तुम्हीही थक्क होऊन जाल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @ lzy_human इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकरी हा जुगाड पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही युजर्स ही कल्पना इंडियाबाहेर जाता कामा नये, असं म्हणत आहेत. तर, अनेक जण पुढच्या वेळी एवढं करण्यापेक्षा नवीन सोफा विकत घे, असंदेखील म्हणताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या देसी जुगाडने सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं आहे, असे म्हणायला हरकत नाही.