Video Shows Mother Is Same For All Child : आपल्यातील अनेकांना प्राण्यांची प्रचंड भीती वाटते. ‘आम्ही माणसांवर प्रेम करू प्राण्यांवर नाही’ असे ते हमखास बोलून जातात. पण, कधी कधी हे प्राणी आपल्याकडे मदत मागण्यासाठीसुद्धा धावून येतात, हे आपण विसरून जातो. ठिकठिकाणी जंगलतोड केल्यामुळे, तर काही ठिकाणी पाणीटंचाई असल्यामुळे जंगलातील प्राण्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो. जंगलातील वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात सगळीकडे वणवण भटकत राहतात. जंगलात अन्न-पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात करावी लागते. तर आज व्हायरल व्हिडीओत (Video) तसेच काहीसे पाहायला मिळाले आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) बहुतेक रेल्वेस्थानकाचा आहे. काही माणसांबरोबर गणवेश घालून काही विद्यार्थी उभे आहेत. त्या ठिकाणी एक माकड येते आणि एका विद्यार्थ्याच्या बॅगेवर उडी मारते. हे पाहून विद्यार्थी घाबरून जातो आणि तिथून बाजूला होतो. मग माकड बाकड्यावर बसलेल्या एका विद्यार्थ्याजवळ जातो. माकड आपल्यावर हल्ला करतोय या भीतीने तोही विद्यार्थी घाबरून पळ काढतो. पण, या सगळ्यात एक महिला मात्र थोडा वेगळा विचार करते आणि नक्की माकड असे का करतेय हे तिच्या लक्षात येते. नेमके काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, माकड काही विद्यार्थ्यांच्या बॅगांवर उड्या घेत असते. त्यामुळे माकड आपल्यावर हल्ला करेल या भीतीने विद्यार्थी घाबरतात. पण, तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेला माकडाला तहान लागली असावी, असा अंदाज येतो आणि ती विद्यार्थ्याच्या बॅगेच्या कडेला ठेवलेली पाण्याची बाटली काढते आणि माकडाला पाणी पाजण्यास सुरुवात करते. माकडसुद्धा तहान लागल्यामुळे पाणी पिते आणि तहान भागल्यावर गुपचूप तिथून निघून जाते.
आईसाठी प्रत्येक मूल सारखेच
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @feed_to_paws या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘सर्व प्राण्यांसाठी औषध जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अन्न आणि पाणीसुद्धा आवश्यक आहे,’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून, मला माझ्या आईची आठवण आली, आईसाठी प्रत्येक मूल सारखेच असते, माणुसकी अजूनही जिवंत आहे, जर प्राण्यांना पाणी प्यायला मिळत नसेल, तर ती खरोखर दुःखद गोष्ट आहे’ आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे.