Viral Video Shows Woman Recreated A Bollywood Song For Her Husband : लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. त्यादिवशी कुठेतरी फिरायला जाणे, आपल्या जोडीदारबरोबर वेळ घालवणे, केक किंवा गिफ्ट आणून सरप्राईज देणे आदी अनेक गोष्टी केल्याने जोडीदार खूप खुश होतो. पण, लग्नाच्या वाढदिवस आणि ऑफिसला सुट्टी नाही असं झालं की दोघांनाही वाईट वाटते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसादिवशी ऑफिसचे काम करताना पाहून बायकोने एक खास गोष्ट केली आहे.

१९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटातील ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं आजही अनेकांना तोंडपाठ आहे. तर हेच गाणं आज एका महिलेने रिक्रिएट केले आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्याला काम करताना पाहून इन्स्टाग्राम युजर गरिमा सिंग, अभिनेते तारिक खान याने गाण्यात परिधान केलेले कपडे घालून आयकॉनिक लूक रिक्रिएट करते. गरिमा कॅमेऱ्याकडे वळते आणि “ओ केहने वाले मुझको फरेबी, कौन फरेबी है ये बता” ने सुरू होणाऱ्या गाण्याच्या बोल लिप-सिंक करण्यास सुरुवात करते. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) …

The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
Sarpanch husband caught cheating on his wife with girlfriend wife beats girlfriend video viral mp
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
hotel Photo Viral
बायकोला वैतागलेल्या नवऱ्यांसाठी खास ठिकाण! हॉटेलच्या नावाची पाटी वाचून चक्रावले नेटकरी, पाहा Viral Photo
group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay
“दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच
After the woman fell from the roof, her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love
VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं

हेही वाचा…VIRAL VIDEO: मैं अपनी फेव्हरेट हूँ! ट्रेनमध्ये आजी करतेयं मेकअप; गर्दीत नट्टापट्टा करताना पाहून नेटकरी म्हणाले, ‘इतका कॉन्फिडन्स हवा…’

व्हिडीओ नक्की बघा…

नशा दौलत का ऐसा भी क्या?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गरिमाचा नवरा वर्क फ्रॉम होम करत असतो. तेव्हा आयकॉनिक लूक रिक्रिएट करून, हातात गिटार घेऊन आणि डोक्याला पट्टी बांधून गरिमा ‘क्या हुआ तेरा वादा’ गाणं गाण्यास सुरुवात करते. जसजसं गाण्याचे बोल गरिमा म्हणत जाते तसतसं तिचा नवरा हावभाव देत असतो. त्यानंतर तो गरीमाला येऊन मिठी मारतो आणि लग्नाच्या वाढदिवसादिवशी काम करण्याची चूक त्याच्या लक्षात येते आणि या व्हिडीओचा गोड शेवट होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @garimaspride या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा माझा नवरा आमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी काम करतात तेव्हा त्यांच्यासाठी माझ्याकडून सरप्राईज गिफ्ट @ajits2212’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओला छान, गमतीशीर की आणखीन काय म्हणू अशी कमेंट एका युजरने केली आहे. तसेच सगळ्यात खास गोष्ट अशी की,बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता देखील व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. तिने या व्हिडीओवर ‘गॉड ब्लेस्ड यू’ अशी कमेंट केली आहे.

v