Viral Video Shows Woman Recreated A Bollywood Song For Her Husband : लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. त्या दिवशी कुठेतरी फिरायला जाणे, आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणे, केक किंवा गिफ्ट आणून सरप्राईज देणे आदी अनेक गोष्टी केल्याने जोडीदार खूप खूश होतो. पण, लग्नाचा वाढदिवस आणि ऑफिसला सुट्टी नाही असं झालं की दोघांनाही वाईट वाटते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसादिवशी ऑफिसचे काम करताना पाहून बायकोने एक खास गोष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटातील ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं आजही अनेकांना तोंडपाठ आहे. तर हेच गाणं आज एका महिलेने रिक्रिएट केले आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्याला काम करताना पाहून इन्स्टाग्राम युजर गरिमा सिंग, अभिनेते तारिक खान याने गाण्यात परिधान केलेले कपडे घालून आयकॉनिक लूक रिक्रिएट करते. गरिमा कॅमेऱ्याकडे वळते आणि “ओ केहने वाले मुझको फरेबी, कौन फरेबी है ये बता”ने सुरू होणाऱ्या गाण्याच्या बोल लिप-सिंक करण्यास सुरुवात करते. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)…

हेही वाचा…VIRAL VIDEO: मैं अपनी फेव्हरेट हूँ! ट्रेनमध्ये आजी करतेयं मेकअप; गर्दीत नट्टापट्टा करताना पाहून नेटकरी म्हणाले, ‘इतका कॉन्फिडन्स हवा…’

व्हिडीओ नक्की बघा…

नशा दौलत का ऐसा भी क्या?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गरिमाचा नवरा वर्क फ्रॉम होम करत असतो, तेव्हा आयकॉनिक लूक रिक्रिएट करून हातात गिटार घेऊन आणि डोक्याला पट्टी बांधून गरिमा ‘क्या हुआ तेरा वादा’ गाणं गाण्यास सुरुवात करते. जसजसं गाण्याचे बोल गरिमा म्हणत जाते तसतसं तिचा नवरा हावभाव देत असतो. त्यानंतर तो गरिमाला येऊन मिठी मारतो आणि लग्नाच्या वाढदिवसादिवशी काम करण्याची चूक त्याच्या लक्षात येते आणि या व्हिडीओचा गोड शेवट होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @garimaspride या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा माझा नवरा आमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी काम करतो तेव्हा त्यांच्यासाठी माझ्याकडून सरप्राईज गिफ्ट @ajits2212’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओला छान, गमतीशीर की आणखीन काय म्हणू अशी कमेंट एका युजरने केली आहे. तसेच सगळ्यात खास गोष्ट अशी की, बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्तादेखील व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. तिने या व्हिडीओवर ‘गॉड ब्लेस्ड यू’ अशी कमेंट केली आहे.

v