Viral Video Of Pune : स्वप्नांचे घर विकत घेण्यासाठी मेहनत आपली असली तरीही त्या घराचा पाया रचणे, त्याला पाहिजे तसा आकार देणे आणि मजबूत बांधकाम करण्याचे काम बांधकाम कामगारांचे असते. त्यामुळे आपले स्वप्नांचे घर उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो हेही नाकारून चालणार नाही. उन्हा-तान्हात काम करणारे हे कामगार अनेकदा बांधकामाच्या ठिकाणी मनोरंजनासाठी काही रील्स तर मजा-मस्ती करताना दिसतात. तर आज असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये बांधकाम करताना भल्यामोठ्या सिमेंटच्या खोलीत उभ्या असलेल्या कामगाराला अनोखा जुगाड करून बाहेर काढण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) पुण्याचा आहे. कामगार पाण्याच्या टाकीचे बांधकाम करताना दिसत आहेत. यामध्ये एक कामगार पाण्याच्या टाक्यात उतरून काम करत असतो. काम संपल्यानंतर त्याला वर यायचे असते. आता इतक्या खोलात जाऊन वर यायचे कसे हा प्रश्न पडतो. मग त्या कामगाराची मदत करण्यासाठी दुसरे कामगार एक जबरदस्त जुगाड करतात. सिमेंटच्या पाण्याच्या टाकीवर एक आडवी शिडी ठेवलेली असते. तर सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत असणाऱ्या कामगाराला त्या शिडीला पकडण्यास सांगतात. तर नक्की काय जुगाड करतात व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

https://twitter.com/PuneriSpeaks/status/1885927084389716063

भारतीय आणि देशी जुगाड यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. एखादी गोष्ट सोपी करण्यासाठी, कधी एखाद्या गोष्टीला मजेशीर वळण देण्यासाठी अनेक देशी जुगाड केले जातात. तर आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा (Video) याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. सिमेंटच्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत असणाऱ्या कामगाला बाहेर काढण्यासाठी जबरदस्त जुगाड केला आहे. कामगार उडी मारून शिडीला पकडतो. त्यानंतर दोन कामगार ही शिडी अलगद उचलतात आणि कामगार त्या शिडीसह अगदी सहज वर येतो, जे पाहून तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

हा जुगाड चुकूनही देशाबाहेर जाता काम नये…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या एक्स (ट्विटर) @PuneriSpeaks अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘हे फक्त आपल्या देशात होऊ शकते’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून जबरदस्त जुगाड, हा जुगाड चुकूनही देशाबाहेर जाता काम नये’ आदी अनेक कमेंट करताना दिसत आहेत. तर तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हेसुद्धा आम्हाला नक्की कळवा.

Story img Loader