Viral Video : हत्ती हा अत्यंत शांत प्राणी आहे. प्रचंड शक्ति आहे म्हणून तो उगाचच इतर प्राण्यांशी लढायला जात नाही. मात्र तुम्ही त्याच्या रस्त्यात आलात तर मात्र त्याचा राग दाखवायला तो मागे पुढे सुद्धा पाहत नाही. खेळकर वृत्तीच्या या हत्तीला भातपीक, केळी, फणस खायला खूप आवडतात.त्यामुळे यांना कोणी प्रेमाने त्यांचे पदार्थ खाऊ घातले तर ते आणखीन खूश होतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत हत्तीला एका अज्ञात माणसाने खाऊ घातलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) मार्केटमधील आहे. रहदारीच्या रस्त्यावर एक मोठा हत्ती सामान वाहून नेताना दिसत आहे. यादरम्यान मार्केटमध्ये एक अज्ञात व्यक्ती केळी विक्रेत्याजवळ उभी असते. इतक्यात त्याची नजर हलत-डुलत येणाऱ्या या हत्तीकडे जाते. मग तो केळी विक्रेत्याकडून केळीचा घड विकत घेतो आणि हत्तीच्या वाटेत ठेवतो. हत्ती पुढे चालत जात असतो. तितक्यात तो केळीचा घड पाहतो. केळीचा घड पाहिल्यानंतर हत्तीची प्रतिक्रिया काय असते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘हेच दिवस आयुष्य जगायला…’ जेव्हा शिक्षणासाठी घरं सोडून हॉस्टेलला जावं लागतं, पाहा हा हृदयस्पर्शी क्षण

व्हिडीओ नक्की बघा…

हत्ती किती आनंदी झाला, ते त्याच्या डोळ्यात बघा…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, समोरून येणाऱ्या हत्तीसाठी अज्ञात व्यक्ती विक्रेत्याकडून केळीचा घड विकत घेते आणि रस्त्यात ठेवून देते. हत्ती पुढे जात असतो. पण, केळीचा घड पाहून थांबतो. पूर्ण केळीचा घड सोंडेत पकडून तो त्याचे सेवन करतो आणि सोंड हलवत तुटहून निघून जातो. मार्केटमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने हा क्षण त्याच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही प्रेम, आपुलकीची गरज असते, जी आपण त्यांना हक्काने दिली पाहिजेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘भावाने छोटीशी मदत केली, पण, त्यानेही हत्ती किती आनंदी झाला, ते त्याच्या डोळ्यात बघा’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली. नेटकरी व्हिडीओ पाहून त्यांच्या हत्तीबरोबरच्या आठवणी कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, ‘मला वाटतं तुम्ही खूप चांगले आहात. आजकल लॉग फॅशन म्हणून पण कोणाला पाच रुपयांची मदत करत नाहीत’ अशी कमेंट केली आहे.