Viral Video Shows Anand Mahindra praised PhD food vendor : दहावी, बारावीनंतर चांगल्या करिअरसाठी सगळेच जण धडपडत असतात. पण, अलीकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. तर अशाच एका तरुणाची आज सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पीएचडी करून या तरुणाने स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आहे. याच तरुणाबद्दल सांगत आनंद महिंद्रांनी पोस्ट केली आहे. नक्की काय आहे या तरुणाची खासियत चला जाणून घेऊ…
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) चेन्नईचा आहे. डॉक्टरेट केलेले रायन १३ वर्षांपासून पार्टटाईम व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय करताना त्यांच्या स्टॉलवर अमेरिकन ब्लॉगर ख्रिस्तोफर लुईस याने भेट दिली. रायनने बनवलेल्या चिकन ६५, चिकन कटलेट्स आदी पदार्थ चाखून अमेरिकन ब्लॉगर प्रभावित झाला. तसेच तो पदार्थ सर्व्ह करणाऱ्या पेपर प्लेट्सचे नाव मंथराई लीफ (mantharai leaf) असे आहे; जे ऑईली पदार्थांसाठी खासकरून वापरले जाते. यादरम्यान ब्लॉगरने विक्रेत्याशी संवाद साधला, तेव्हा विक्रेत्याने स्वतःचे नाव गूगलवर सर्च करण्यास सांगितले. नाव सर्च केल्यावर काय दिसलं, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
“माझं नाव गूगल करा”
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, ब्लॉगर ख्रिस्तोफर लुईस ब्लॉगर तरुणाशी संवाद साधत असतो. यादरम्यान तरुण “माझं नाव गूगल करा,” असे ब्लॉगरला सांगतो. नाव सर्च केल्यानंतर ब्लॉगरला वाटले कदाचित फूड स्टॉलबद्दल गूगलवर सर्च करण्यास सांगितल असेल किंवा पदार्थाना रेटिंग द्यायची असेल. पण, तसं न करता तो गूगलवर स्वतःचे नाव सर्च करून त्याने लिहिलेले काही ऑनलाईन आर्टिकल्स दाखवतो. तरुणीचे हे अनोखा टॅलेंट पाहून आनंद महिंद्रासुद्धा खूश झाले. आनंद महिंद्रा यांनी विक्रेत्याबद्दल प्रशंसा करत काय म्हृटल आहे, व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा नक्की वाचा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video ) @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘ही क्लिप गेल्या महिन्यात व्हायरल झाली होती. एका अमेरिकन ब्लॉगरला फूड स्टॉल चालवणारा पीएच.डी. विक्रेता सापडला. पण, मला खरोखरचं आश्चर्य वाटले जेव्हा त्याने त्याचा फोन उचलला आणि ब्लॉगरला वाटले की तो त्याला त्याच्या स्टॉलबद्दल सोशल मीडियावर दाखवणार आहे. पण त्याऐवजी, तो अभिमानाने त्याला त्याने लिहिलेले आर्टिकल्स ऑनलाइन दाखवतो! अविश्वसनीय. अद्वितीय. भारतीय’; अशी कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओला दिली आहे आणि त्याचे टॅलेंटचे कौतुक केलं आहे.