Viral Video Shows Son Creating scene of kantara movie : मुलाला जन्म दिल्यापासून ते त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यापर्यंत आईनं मेहनत आणि कष्ट घेतलेले असतात हे नाकारून चालणार नाही. लहानपणी चांगल्या गोष्टीचं कौतुक आणि चुकीबद्दल हक्कानं दिलेला मार अशा संमिश्र भावभावनांचे दर्शन घडविणारी आई कधी आपल्याला आवडते; तर कधी तिचा रागही येतो. पण, नंतर हळूहळू आपल्याला तिच्या कृतींचं महत्त्व पटू लागतं. आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये चिमुकल्याच्या एका कृतीवर त्याला आईकडून जोरात धपाटा मिळाला आहे. नक्की काय घडलं, चिमुकल्यानं नक्की काय केलं ते व्हायरल व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ…

ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०२२ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला हा चित्रपट होता. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं अनेकांची मनं जिंकून घेतली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत हा सिनेमा टीव्हीवर सुरू असतो. या चित्रपटातील जोरात ओरडण्याचा सीन पाहून चिमुकला तो रिक्रिएट वा नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. पण, आईला काहीतरी वेगळंच वाटतं आणि ती घरात येऊन चिमुकल्याला फटका मारते. नक्की चित्रपटातील कोणता सीन चिमुकला रिक्रिएट करीत होता ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Who is gajabhau
“असशील तिथून तुला उचलणार”, मोहित कंबोज यांनी धमकी दिलेला गजाभाऊ नेमका कोण? महायुतीला सातत्याने केलंय टार्गेट!
uncle dance video goes viral
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका’ गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर

हेही वाचा…पायऱ्यांवरून सामान उतरवण्याचं टेन्शन दूर; ‘त्यानं’ शोधला असा जुगाड की… VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या

व्हिडीओ नक्की बघा…

आई कुठे काय करते

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकला कांतारा हा सिनेमा बघत असतो. यादरम्यान अंगावर काटा आणणारा एक सीन सुरू असतो. तेव्हा चिमुकला चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ओरडू लागतो. चिमुकला ओरडला हे ऐकून आई घाबरते. ती घराच्या आतमध्ये येते आणि बघते की, मुलगा तर चित्रपट बघून ओरडतो आहे. चिमुकला विनाकारण ओरडला, असं आईला वाटतं आणि ती चिमुकल्याला मारते. पण, चिमुकला सिनेमातील सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण, आईनं आपल्याला विनाकारण मारलं, अशी त्याची भावना झाल्यामुळे चिमुकला ढसढसा रडायला लागतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mimarathiaahe_ आणि @maharashtra_w या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘आई कुठे काय करते’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच ‘त्याची काय चूक होती’, असा मजकूर व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. काही जण चिमुकल्याला बिचारा म्हणत आहेत; तर काही जण आईची बाजू घेताना दिसत आहेत.

Story img Loader