Viral Video Shows Aunt And Nephew Beautiful Moment : आपल्याला आई इतकीच जवळची आणि आपलीशी वाटणारी एकमेव स्त्री म्हणजे ‘मावशी’ असते. तिचा आपल्या आईपेक्षाही आपल्यावर कदाचित जास्तच जीव असतो. हक्काने ओरडणारी पण लाडाने जवळ करणारी मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ अशी ही मावशी भाच्यांसाठी सुद्धा खास असते. तर आज सोशल मीडियावर या नात्याचे एक सुंदर उदाहरण पाहायला मिळाले आहे. मावशी नाचत असताना अगदी बॉडीगार्डप्रमाणे तिचा भाचा तिच्या पाठीशी उभा असलेला दिसतो आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार (Video) डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम असतो. यादरम्यान एक तरुणी चंद्रा या गाण्यावर डान्स करण्यासाठी पुढे जाते. तर तिच्या मागून तिचा भाचा सुद्धा जातो आणि अगदी तिच्या मागे उभा राहतो. चंद्रा हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजण्यास सुरुवात होते आणि चिमुकल्याची मावशी (तरुणी) नाचण्यास सुरुवात करते. पूर्ण डान्स होईपर्यंत भाचा मावशीच्या मागे अगदी एखाद्या बॉडीगार्डप्रमाणे उभा असतो, जे पाहून तुम्हाला कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ…

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/reel/DFqR0WUz_KK/?igsh=cmI2dTA5a3d5dm0x

एखाद्या कार्यक्रमाला प्रसिद्ध व्यक्तीला किंवा अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी बॉडीगार्ड नेमून दिलेले असतात. जेणेकरून अतिउत्साही प्रेक्षक त्यांना त्रास देणार नाहीत. तर आज मावशी डान्स करताना तिच्या डान्समध्ये कोणी अडथळा आणणार नाही, याची जवाबदारी घेण्यासाठी भाचा बॉडीगार्ड बनलेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे मावशीच्या डान्स कौशल्य पाहूनही तो थक्क झाला आहे हे त्याच्या हावभावावरून दिसून येईल आणि तुम्ही डान्सर मावशी आणि तिच्या बॉडीगार्ड भाच्याची नक्कीच प्रशंसा कराल एवढे तर नक्की…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @chaamprudraa आणि @snehalraghorte या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मावशीचा छोटासा बॉडीगार्ड’ अशी कॅप्शन तर ‘ छोटासा भाचा त्याच्या मावशीला कधीच एकट सोडू शकत नाही ; असा मजकूर व्हिडीओवर व्हिडीओवर देण्यात आला आहे. एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे की, ‘भाचा नाही ओ मुलगाच आहे की’ तर अनेक जण व्हिडीओवर हार्ट इमोजीसह प्रसंशा करताना दिसत आहेत.

Story img Loader