Viral Video Shows Aunt And Nephew Beautiful Moment : आपल्याला आईइतकीच जवळची आणि आपलीशी वाटणारी एकमेव स्त्री म्हणजे ‘मावशी’ असते. काही ठिकाणी आईपेक्षाही मावशीचा कदाचित जास्तच जीव असल्याचे आढळून येते. मग हक्काने ओरडणारी; पण लाडाने जवळ करणारी मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, अशी ही मावशी भाच्यांसाठीसुद्धा खास असते. तर, आज सोशल मीडियावर या नात्याचे एक सुंदर उदाहरण एका व्हिडीओमधून (Video) पाहायला मिळाले आहे. त्यामध्ये डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात मावशी नाचत असताना तिचा भाचा अगदी बॉडीगार्डप्रमाणे तिच्या पाठीशी उभा असल्याचे दिसते आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार (Video) डोहाळजेवणाचा कार्यक्रम असतो. त्यादरम्यान एक तरुणी चंद्रा या गाण्यावर डान्स करण्यासाठी पुढे जाते. तिच्यामागून तिचा भाचासुद्धा जातो आणि अगदी तिच्या मागे उभा राहतो. चंद्रा हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजण्यास सुरुवात होते आणि चिमुकल्याची मावशी (तरुणी) नाचण्यास सुरुवात करते. पूर्ण डान्स होईपर्यंत तो भाचा मावशीच्या मागे अगदी एखाद्या बॉडीगार्डप्रमाणे उभा असतो, जे पाहून तुम्हाला कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/reel/DFqR0WUz_KK/?igsh=cmI2dTA5a3d5dm0x

एखाद्या कार्यक्रमाला प्रसिद्ध व्यक्तीला किंवा अभिनेता व अभिनेत्रीसाठी बॉडीगार्ड नेमून दिलेले असतात; जेणेकरून अतिउत्साही प्रेक्षक त्यांना त्रास देणार नाहीत. तर आज मावशी डान्स करताना तिच्या डान्समध्ये कोणी अडथळा आणणार नाही, याची जबाबदारी घेण्यासाठी भाचा बॉडीगार्ड बनलेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे मावशीच्या डान्सचे कौशल्य पाहूनही तो थक्क झाला आहे हे त्याच्या हावभावांवरून दिसून येईल. ते पाहिल्यावर तुम्ही डान्सर मावशी आणि तिच्या बॉडीगार्ड भाच्याची नक्कीच प्रशंसा कराल एवढे तर नक्की.

भाचा नाही ओ मुलगाच आहे की…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @chaamprudraa आणि @snehalraghorte या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मावशीचा छोटासा बॉडीगार्ड’ अशी कॅप्शन आणि छोटासा भाचा त्याच्या मावशीला कधीच एकटं सोडू शकत नाही, असा मजकूर व्हिडीओवर देण्यात आला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, भाचा नाही ओ मुलगाच आहे की. तर, अनेक जण व्हिडीओवर हार्ट इमोजीसह त्यांची प्रशंसा करताना दिसत आहेत.