Video Shows Auto Rikshaw Driver Decorate His Rikshaw : प्रत्येकाला आपले वाहन प्रिय असते. आपले वाहन कसे आकर्षक दिसेल या दृष्टीने वाहनचालक मेहनत घेत असतात. मग ती सजावट करणे असो, खास नंबर प्लेट असो किंवा वाहनात एखादी सोय-सुविधा असो. काही रिक्षा वा इतर प्रवासी वाहनांमध्ये आकर्षक स्टिकर्सचादेखील वापर केला जातो. पण, तुम्ही तुमच्या वाहनांवर किती खर्च करू शकाल याचा काही अंदाज करू शकता का? आज अशाच एका रिक्षाचालकाची चर्चा होत आहे; ज्याने बहुतेक लाखभराची रक्कम खर्च करून त्याची रिक्षा सजवली आहे. त्याने नक्की काय सजावट केली असेल? चला जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओत एक प्रवाशाला रिक्षातून प्रवास करताना दिसले की, रिक्षाचालकाने रिक्षामध्ये वायफायची सोय केली आहे आणि त्याचा पासवर्डसुद्धा लिहून ठेवला आहे. तसेच रिक्षामध्ये एक छोटासा टीव्हीसुद्धा लावला आहे. प्रवासी बसतात त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला मॅगझिन्सही ठेवली आहेत. दोन्ही बाजूंना आयपॅड, समोर दोन टॅबलेट, अशा बऱ्याच सोई रिक्षाचालकाने प्रवाशांसाठी केल्याचे दिसते आहे. रिक्षाचालकाने प्रवाशांसाठी खास सोई-सुविधांनी सजवलेली ही रिक्षा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, रिक्षाचालकाने डॉक्टर, शिक्षक, परिचारिका आणि स्वच्छता कामगारांना त्याची रिक्षातून मोफत प्रवासाची सुविधा देऊ केली आहे. तसेच रिक्षातून प्रवाशाला लांब प्रवास करायचा असल्यास त्याला कंटाळा येऊ नये म्हणून काही मॅगझिन्सही ठेवली आहेत. तसेच मनोरंजनप्रेमी प्रवाशांसाठी मोफत वायफाय सुविधा देऊन, टॅबलेटचीही व्यवस्था केली आहे. अशा सर्व सोई-सुविधांनी सज्ज असलेली ही रिक्षा पाहून प्रवासी थक्क झाला आणि त्याने रिक्षाचालकासह रिक्षाचा व्हिडीओ शूट करून घेतला. या सगळ्या सोई-सुविधा पाहून तुम्ही एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आला आहात की काय, असेच जणू तुम्हाला वाटेल एवढे तर नक्की…

मग रिक्षा अगदी फाईव्ह स्टार हॉटेलसारखी वाटेल

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @memes18.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘खूप श्रीमंत लोक आहेत’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “दादा, एसीसुद्धा लावून घे”, “शिक्षक, डॉक्टर, परिचारिका आणि स्वच्छता कामगारांसाठी मोफत प्रवास हे पाहून आदर वाटला”, “फक्त एसी बाकी आहे मग रिक्षा अगदी फाइव्ह स्टार हॉटेलसारखी वाटेल”, “तो आधीच श्रीमंत आहे; पण आवड म्हणून रिक्षा चालवतो आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.