Viral Video : मुलांचे लाड करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी त्यांचे हट्ट पुरवतात, तर कोणी थोडंसं ओरडून दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांचे मन रमवतात. सध्या नोकरीअभावी घराबाहेर राहणारे पालक मुलांना मोबाईलवरून गाणी किंवा गोष्टी लावून देतात किंवा ते स्वतः गाणे गुणगुणतात. त्यामुळे ही गाणी नकळत लहान मुलांनाही आवडू लागतात. तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Viral Video) असेच काहीतरी दर्शवतो आहे. चिमुकल्याचा त्याच्या वाढदिवसाला हॅप्पी बर्थडेचे गाणे नाही, तर कोणते तरी वेगळेच गाणे ऐकण्यासाठी हट्ट सुरू आहे.
वाढदिवसाला लहान मुले रडतात हे आपण अनेकदा पाहिले आहे. वाढदिवसाला माणसांची गर्दी, चिमुकल्याला घातलेले नवनवीन कपडे कित्येकदा त्यांना नकोसे वाटू लागतात. तर आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा होत असतो. यादरम्यान हॅप्पी बर्थडे हे गाणे वाजत असते. पण, चिमुकला जोरजोरात रडण्यास सुरुवात करतो. कदाचित या गाण्याऐवजी त्याला दुसरे गाणे ऐकायचे असते. हे जेव्हा त्याच्या आईला कळते. तेव्हा ती डीजे ऑपरेट करणाऱ्याला चिमुकल्याचे आवडते गाणे लावण्यास सांगते. चिमुकल्याचे आवडते गाणे कोणते आहे व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकला जोरजोरात रडत असतो. हे पाहून हॅप्पी बर्थडेऐवजी त्याला आवडणारे ‘एक मोटा हाथी घुमने गया’ (Ek Mota Hathi Ghumne Gaya) हे गाणे लावले जाते. तसेच जमलेली अनेक मंडळी हॅप्पी बर्थडेऐवजी मग ‘एक मोटा हाथी घुमने गया’ हे गाणे मोठमोठ्याने गाण्यास सुरुवात करतात. त्यामुळे चिमुकल्याच्या चेहऱ्यावर हसू येते आणि एक आनंदी वातावरण व्हिडीओत पाहायला मिळते. मग इथेच व्हिडीओचा शेवटदेखील होतो.
आता फक्त हेच बघायचं बाकी होतं
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @chira_gkumar2024 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आता फक्त हेच बघायचं बाकी होतं, हॅप्पी बर्थडे नाही, तर चिमुकल्याला मोटा हाथी ऐकायचं असतं”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि मूल हे देवाचं रूप असतं, असे म्हणत आहेत. तर, काही पालक आमच्या मुलांनासुद्धा हेच गाणं आवडतं, असे आवर्जून व्हिडीओच्या कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.