Viral Video Shows Group Of bikers Chase Car: आजकाल विचित्र स्टंट करून प्रसिद्धी मिळविणे, असा प्रयत्न अनेक जण करीत असतात. या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते कोणाचाही छळ करण्यास मागे-पुढे बघत नाहीत आणि मग ते कधी स्वतःचा, कधी इतरांचा जीव धोक्यात घालताना दिसतात. मग, असे व्हिडीओ व्हायरल होतात आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये काही दुचाकीचालक एका कारचालकाचा पाठलाग करताना आणि त्याला त्रास देताना दिसून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ बंगळुरूचा आहे. पाच जणांचा ग्रुप एका चारचाकी चालकास त्रास देताना दिसत आहे. हा ग्रुप दोन दुचाकींवरून प्रवास करीत असतो. दुचाकीस्वारांची एक स्कुटी कारच्या मागून येत असते; तर दुसरी स्कुटी कारच्या बाजूनं जाताना दिसते. बघता बघता दुचाकीस्वार कारच्या दरवाजाला लाथ मारतात आणि पुढे जाऊन एका चाकावर स्कुटी चालवण्याचा स्टंटदेखील करतात. नक्की काय घडलं, दुचाकीस्वारकांनी कशा प्रकारे कारचालकास त्रास दिला ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘तुला जे करायचं आहे ते कर…’ डिलिव्हरी बॉयची अजब दादागिरी; ग्राहकाचे पार्सल घेऊन आला अन्… VIRAL VIDEO तून पाहा नक्की काय घडलं

व्हिडीओ नक्की बघा…

दुचाकीस्वारांनी अज्ञात गाडीचालकाला दिला त्रास:

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एका अनोळखी गाडीचालकानं हे दृश्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलं आहे. काही दुचाकी चालक मिळून कारचालकास त्रास देताना दिसत आहेत. सुरुवातीला ते कारचालकाचा पाठलाग करतात आणि मग त्याच्या कारवर जोरात लाथदेखील मारतात. हा व्हिडीओ पाहून एका नेटकाऱ्यानं कमेंट केली, “मी सहसा लोकांबरोबर काहीही वाईट घडावं यासाठी प्रार्थना करीत नाही. पण, यावेळी या तरुणांनी स्कूटरवर पडणे आवश्यक आहे. अपघातात निष्पाप जीव मरण पावतात; पण हे बदमाश पळून जाण्यात यशस्वी होतात”, अशी कमेंट केली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि बंगळुरू पोलिसांना टॅग केले. त्यामुळे हा व्हिडीओ इतका प्रचंड व्हायरल झाला की, बंगळुरू पोलिसांनीसुद्धा यावर कमेंट केली आहे आणि लिहिलं, “सिल्क बोर्ड जंक्शन येथे सार्वजनिक रस्त्यावर कारचालकाला त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची दुचाकी जप्त केली आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows bikers is seen driving close to the car and kicking its door after they do wheelie stunt amidst traffic must watch asp
Show comments