Viral Video Of Little Boy : लहानपणी आपण प्रत्येकाने कधी ना कधी नक्कीच खोड्या केल्या असतील. त्या खोड्या आता मोठेपणी आठवल्या की, आपल्याला खूप हसायला येते आणि हे आपण का आणि कशासाठी केले याबद्दल अनेकदा वाईट, आश्चर्यचकित तर कधी विचित्र अशा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी भावना निर्माण होऊ शकते. आपण केलेल्या या खोड्या आपल्याला कोणी मोठेपणी सांगितल्या की, आपण त्या व्यक्तीचे म्हणणे मान्य करण्यास नकार देतो. पण, जर याचा पुरावा म्हणून व्हिडीओ किंवा फोटो असेल, तर मात्र आपल्या खोड्या कोणापासून लपून राहू शकत नाहीत. आज सोशल मीडियावर असाच काहीसा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) नेमका कधीचा आहे याची माहिती दिली गेलेली नाही. पण, दारात एक कंदील लावलेला दिसतो आहे. एका चिमुकल्याला अचानक काय कल्पना सुचते माहीत नाही. पण, तो एक आगपेटी किंवा मेणबत्ती घेऊन कंदिलाच्या लटकणाऱ्या मोठ्या पट्ट्यांना आग लावतो. त्याला वाटते ही परिस्थिती तो सहज हाताळू शकेल. पण, असे केल्याने कंदील पेटण्यास सुरुवात होते आणि कंदिलाच्या लटकणाऱ्या मोठ्या पट्ट्या जळून खाली पडू लागतात. हे पाहून तरुण तिथून पळ काढतो. मग पुढे नेमके काय घडते ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, चिमुकला मस्तीमध्ये कंदिलाच्या लटकणाऱ्या मोठ्या पट्ट्यांना आग लावतो. आग कंदिलाच्या अगदी टोकापर्यंत जाते तेव्हा मात्र तो घाबरून जातो आणि मागे जाऊन उभा राहतो. कारण- परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेलेली असते. कंदिलाच्या लांबलचक मोठ्या पट्ट्या आगीमुळे जळून खाली जमिनीवर पडलेल्या असतात. हे पाहून तो ते सर्व स्वच्छ करण्यासाठी मॉप घेऊन येतो. पण, आई ओरडेल या भीतीने पुन्हा जाऊन ठेवतो. अखेर हे सगळे आई बघते आणि चिमुकल्याकडून स्वच्छ करून घेते. पण, त्याला आईकडून मार पडला की नाही हे कळायच्या आतच व्हिडीओचा शेवट होतो.
मस्ती आली अंगलट
व्हिडीओ संपेपर्यंत पुढे काय होईल याची धाकधूक आणि क्षणागणिक तुमच्याही चेहऱ्यावर नकळत हसू येईल आणि तुम्हाला तुम्ही केलेली एक तरी खोड आठवेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @top_3_pictures या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून, त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवले आहेत आणि ते त्यांच्या खोड्या कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बघण्याच्या नादात माझे गॅसवर ठेवलेले दूध उतू गेले, मीपण असेच केलेले आणि माझ्यामुळे घरात आग लागली होती, काय खतरनाक पोरगा आहे, आदी अनेक मजेशीर कमेंट्स व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.