viral Video Shows Family Recreates Samdhi Samdhan song : १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट एकदा-दोनदा नव्हे तर आपण सगळ्यांनी अनेकदा पहिला असेल. या चित्रपटात तब्बल १४ गाणी होती. चित्रपटातील प्रत्येक गाण्यांनी अनेकांच्या मनात घर केले आहे, त्यामुळे या चित्रपटातील गाणी तितक्याच आवडीने आजही ऐकली जातात. या सगळ्यात सलमान खान आणि माधुरी दीक्षित या हिट जोडीबरोबरच रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू आणि अलोकनाथ यांचे ‘समधी समधन’ (आज हमारे दिल में) हे गाणं तुम्हाला आठवतय का? हो… तर आज सोशल मीडियावर हेच गाणं एका कुटुंबाने रिक्रिएट केलं आहे.

‘हम आपके है कौन’ या चित्रपटात रेणुका शहाणे म्हणजेच पूजा या पात्राच्या लग्नादरम्यान दोन्ही कुटुंबांमध्ये एक संगीत कार्यक्रम सुरू असतो, तर इन्स्टाग्राम युजर संजना रोहानीने असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हर्षित आणि खुशी या जोडप्याच्या लग्न समारंभाचा एक कार्यक्रम सुरू असतो. त्यादरम्यान वर आणि वधूच्या कुटुंबातील सदस्यांनी हे गाणं रिक्रिएट केलं आहे. कुटुंबातील एका सदस्याने अगदी मूळ चित्रपटातील अनुपम खेरच्या विचित्र नृत्याची नक्कलसुद्धा केली. कशाप्रकारे हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे, व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) नक्की बघा…

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?

हेही वाचा…‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, हर्षित आणि खुशीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाच्या उत्सवादरम्यान ‘समधी समधन’ हे गाणं हुबेहूब सादर करून दाखवलं आहे. स्टेजवर एकीकडे सगळ्या महिला, तर दुसरीकडे पुरुष मंडळी बसले आहेत. त्यानंतर पेटीच्या साहाय्याने ‘आज हमारे दिल में’ या गाण्याचे बोल सादर केले जात आहे. हुबेहूब गाण्याचे बोल, गाण्यातील पात्रांचे हावभाव; तर काही गाण्यातील काही पात्रांच्या डान्स स्टेप्ससुद्धा सादर केल्या जात आहेत, जे पाहून तुम्ही टाळ्या वाजवत नक्कीच कौतुक कराल.

फिल्मी दुनिया

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sanjana_r565 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘असा एक माहेर आणि सासरच्या मंडळींचा डान्स पर्फोमन्स तर व्हायलाच पाहिजे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून कुटुंबातील सदस्यांचे भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने हा व्हिडीओ पाहून ‘फिल्मी दुनिया’ अशी कमेंट केली आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक डान्स पर्फोमन्स पाहिले असतील, पण कुटुंबातील सदस्यांच्या या खास सादरीकरणाने तुमचेही मन जिंकून घेईल एवढं नक्की…

Story img Loader