Viral Video Of Car Owner : ईएमआयद्वारे पैसे भरून नवीन बाईक किंवा एखादी कार खरेदी करणे आता अधिक सोपे झाले आहे. पण, बाईक किंवा कारच्या मालकाला बाईक वा कार कशी चालवायची, ट्रॅफिक नियम काय हे माहीत असणेही गरजेचे आहे. पण, तरीही कित्येक जण आपल्याकडे बाईक किंवा कार आहे ही गोष्ट दाखवण्याला जास्त प्राधान्य देतात आणि याच गोष्टीमुळे रस्त्यावर गंभीर अपघात होत असतात किंवा इतरांच्या पुढे जाण्याचा उत्साह आपल्याला नडतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.
व्हिडीओनुसार एका गाडीचालकाला पुढे जाण्याची प्रचंड घाई दिसते आहे. गाड्यांच्या रांगेत तो उभा असतो आणि त्याच्या पुढे व मागेही ट्रक असतो. तर, दुसऱ्या मार्गिकेमधून एक ट्रक जातो आणि रस्ता मोकळा झाला, असे त्याला वाटते. पुढे जाण्याच्या नादात तो दुसऱ्या मार्गिकेमधून गाडी काढण्याचा प्रयत्न करतो. कारचालकाला वाटते की, तो यशस्वी झाला आणि इतर गाडयांना मागे टाकत तो अगदी सहज पुढे गेला. पण, इथेच एक ट्विस्ट येतो. नक्की काय घडले ते पुढे व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
इथेच तो फसतो…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, दुसऱ्या मार्गिकेमधून ट्रक गेल्यावर अगदीच हुशारीने कारचालक आपली गाडी दुसऱ्या मार्गिकेमधून काढण्याचा प्रयत्न करतो. पण, इथेच तो फसतो. कारण- तो कार घेऊन पुढे जाताच समोरून एक दुसरा ट्रक येतो. ट्रक येताच दुसऱ्या मार्गिकेच्या शेजारी एक रस्ता असतो आणि तिथे कार रिव्हर्समध्ये नेऊन आपली गाडी उभी करावी लागते. त्यानंतरही तो दोनदा ते तीनदा प्रयत्न करतो; पण त्याचा पुढे जाण्याचा डाव फसतो आणि तो गाडीमधून उतरून बाजूला उभा राहतो, जे पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @love.connection_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि मजेशीर कमेंट्स करताना दिसून आले आहेत. “भाऊ गाडीतून उतरून चालायला लागला वाटतं, याला म्हणतात रिव्हर्स प्रॅक्टिस”, “त्याने लॉकडाउनमध्ये कार चालवायला सुरुवात केली. एक पाऊल पुढे, दोन पावले मागे अशी अवस्था आहे याची” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.