Video Shows Video Shows Cat Hold Sick Owner Hand : मुक्या प्राण्यांचं नि:स्वार्थी प्रेम हे शब्दांत मांडणे खरे तर कठीण आहे. मालक घरी येईपर्यंत सोफ्यावर बसून त्याची वाट पाहणे, मालक नाराज झाल्यावर आपल्या अंदाजात त्याला मनधरणी करणे, मालक आजारी असल्यावर सतत त्याच्याजवळ जाऊन बसणे आदी अनेक गोष्टी हे मुके प्राणी नकळत त्यांच्या मनात मालकासाठी असणारी काळजी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी करत असतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये एका मांजरीने अनोख्या पद्धतीने आपल्या मालकाला आपण त्याच्या वाईट काळातही बरोबर आहोत याची जाणीव करून दिली आहे.

व्हायरल व्हिडीओत मालक झोपलेला दिसतो आहे. तसेच त्याच्या हाताला काही बँडेज किंवा पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत. मालक आजारी आहे किंवा त्याला काहीतरी लागले आहे याची जाणीव घरातील पाळीव मांजराला बहुतेक झाली आहे. तेच लक्षात घेऊन ती आपल्या मालकापाशी बेडवर जाते. त्यानंतर त्याच्या बँडेज लावलेल्या हाताकडे बघते. त्यानंतर पाळीव मांजर नेमके काय करते हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

तुला जपणार आहे…

असे म्हणतात की, जेव्हा आपला वाईट काळ सुरू असतो तेव्हा आपली साथ कोण देते, आपल्यासाठी कोण उभे असते, आपली खरी माणसे कोण हे आपल्याला तेव्हाच समजते. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, मांजर आपल्या मालकाच्या हातावर बँडेज बघते आणि आपल्या पंजाच्या साह्याने हळूच त्याच्या हातावर पंजा ठेवते आणि ‘मी तुझ्याबरोबर आहे याची जाणीव करून देते’. असे एकदा नाही, तर दोन वेळा मांजर आपल्या पंजाच्या साह्याने असे करते. जे पाहून मालकाला खूप आनंद होतो. तसेच मालक या क्षणाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर करतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aavidacatlover_photographer111 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘एक वेळ आपली माणसे आपल्या वाईट काळात सोडून जातील. पण, हे मुके प्राणी शेवटपर्यंत साथ देतील’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “अगदी बरोबर”, “अप्रतिम, खरं आहे”, “तुला जपणार आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.