लहान बाळ चालायला सुरू झालं की त्याच्याप्रत्येक हालचालींवर पालकांची नजर असणे गरजेचे असते. लहान बाळांवरील नजर हटल्यावर बाळाला काही समजत नसल्याने काहीही करण्याची शक्यता असते. लहान मुलं खूप निरागस असतात. अनेकवेळा नकळत ते असं काहीतरी करतात की, ज्याचे परिणाम त्यांना व त्यांच्या पालकांना भोगावे लागतात. अनेकदा लहान मुलं खेळाताना अजानतेपणी अशा काही गोष्टी करतात की, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. कधीकधी तर या मुलांचा जीवदेखील धोक्यात येतो. अशा अनेक घटना आपण सोशल मीडियावर पाहात असतो. म्हणूनच पालकांनी प्रत्येक क्षणी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांकडे जरा दुर्लक्ष झालं की मुलं कुठे जाऊन पोहचातात हे या व्हिडीओमध्ये पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता फक्त सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये एक मूल एका बहुमजली इमारतीच्या धोकादायक काठावर चालताना आणि धावताना दिसत आहे. मुलाचे वय सुमारे ३ वर्षे असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मुल उघड्या खिडकीतून बाहेर येते आणि थेट इमारतीच्या सर्वात धोकादायक भागाकडे चालू लागते. धावत धावत तो खोलीच्या बाल्कनीत जातो. तो बाल्कनीत उतरण्याचा प्रयत्न करतो, पण उतरू शकत नाही. यानंतर तो मागे फिरतो आणि पुन्हा खिडकीकडे जातो. या दरम्यान, मुलाचा पाय देखील एक किंवा दोनदा अडखळतो. मात्र, सुदैवाने मुलाने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि खिडकीतून परत आत गेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: याला म्हणतात संस्कार! ’या’ चिमुकलीचं होतंय सोशल मीडियावर प्रचंड कौतुक

हा व्हिडिओ स्पेनमधील असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे आई-वडील अंघोळ करत होते. मुलगा एकटा होता त्यामुळे तो नकळत खिडकीतून खाली उतरून इमारतीच्या काठावर आला. मुलाला किनाऱ्यावर पळताना पाहून समोरच्या अपार्टमेंटमध्ये उपस्थित असलेल्या एका मुलीने त्याचा व्हिडिओ बनवला. तर वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी थेट सुरक्षारक्षकाकडे धाव घेतली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows child walk on narrow ledge of building in spain childcare trending srk