Viral Video Of Childhood Friends : आपल्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. काही मित्र-मैत्रिणी शाळा, कॉलेज किंवा नोकरी दरम्यानसुद्धा भेटलेले असतात. पण, या सगळ्यात जास्त खास असते ती बालपणीची मैत्री. जीवाला जीव देणारे, आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या, वाईट गोष्टीमध्ये साथ देणारे, आपला स्वभाव जाणणारे, सुरुवातीपासून आपला प्रवास बघणारे, एकूणच जीवाला जीव देणारे असतात ते बालपणीचे मित्र. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लहानपणीच्या मैत्रिणींनी त्यांचा एक खास व्हिडीओ रिक्रिएट केला आहे.

व्हायरल व्हिडीओची सुरुवात तीन चिमुकलींच्या डान्सने होते. प्रीती झिंटा, हृतिक रोशन यांचा २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘मिशन काश्मीर’ या चित्रपटातील ‘बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो’ हे गाणं आपल्यातील अनेकांनी ऐकलं असेल; तर याच गाण्यावर या चिमुकली डान्स करताना दिसत आहेत. पण, खास गोष्ट म्हणजे या चिमुकल्या आता मोठ्या झाल्या आहेत आणि लहानपणीचा व्हिडीओ त्यांनी पुन्हा रिक्रिएट केला. तर रिक्रिएट केलेल्या व्हिडीओत एक ट्विस्टसुद्धा आहे. काय आहे हा ट्विस्ट व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

हेही वाचा…कौतुकास्पद! टाकाऊ पुठ्ठ्यांपासून बनवला स्टेथॉस्कोप, कॅलक्युलेटर अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही कराल क्रिएटिव्हिटीला सलाम!

व्हिडीओ नक्की बघा…

२३ वर्षांनंतर रिक्रिएट केला क्षण

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, बालपणीच्या या तीन मैत्रिणींपैकी एकीचं लग्न ठरलेलं असतं, तर लग्नाच्या निमित्ताने या तिघी पुन्हा ‘बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो’ हा डान्स करण्याचा विचार करतात. या तिन्ही मैत्रिणी लग्नातील एका कार्यक्रमादरम्यान लहानपणी केलेला डान्स पुन्हा रिक्रिएट करतात आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देतात. त्यांनी व्हिडीओमध्ये सुरुवातीला त्यांच्या लहानपणीच्या डान्सचे काही क्षण आणि पुढे २३ वर्षांनंतर केलेल्या डान्सचे काही क्षण असा जोडून हा खास व्हिडीओ तयार केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @abida_dhanani and @kiranjmeghani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘२३ वर्षांनंतर तेच गाणे सादर करत आहोत, पण एका ट्विस्टसह’; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांच्या लहानपणीच्या मित्र-मैत्रिणींना कमेंटमध्ये टॅग करताना दिसत आहेत.

Story img Loader