Viral Video Shows Children dance on Kurchi Madathapetti Tamil Song : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता महेश बाबूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुंटूर कारम’ या चित्रपटाची मध्यंतरी जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटातील ‘कुर्ची मदातापेट्टी’ गाण्याची पहिली झलक जेव्हा समोर आली तेव्हापासून या गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ दिसली. महेश बाबू आणि अभिनेत्री श्री लीला यांच्या जबरदस्त डान्सने तर सगळ्यांना वेडच लावले. अगदी शाळा, कॉलेजच्या मुलांपासून या गाण्यावर सगळेच जण ठेका धरून डान्स करू लागले. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की, त्यामध्ये चक्क चिमुकल्यांनी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
व्हायरल व्हिडीओ ( Viral Video) ‘लिटल विंग्स स्कूल’मधील आहे. चिमुकल्यांच्या वार्षिकोत्सव कार्यक्रमादरम्यान हा क्षण चित्रित करण्यात आला आहे. या गाण्यावर डान्स करण्यासाठी चिमुकल्यांनी साऊथ इंडियन लूक केला आहे. लहान मुलींनी साड्या, केसात गजरा माळून आणि लहान मुलांनी पांढरा कुर्ता आणि धोती परिधान केली आहे. गाणे सुरू होताच सुरुवातीला म्युझिक असते. या म्युझिकवर चिमुकल्यांनी केलेली स्टेप पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, चिमुकल्यांनी दाक्षिणात्य कपडे परिधान करून, अगदी मजेशीर पद्धतीने डान्स केला आहे. एक चिमुकला, दुसऱ्या चिमुकल्याला बघून, तर एक आपल्याच धुंदीत नाचून, तर काही शिक्षिका मुलांना प्रेक्षकांमधून बसून डान्स स्टेप्स दाखवीत त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. या गाण्यावर अशा अनोख्या पद्धतीने डान्स होऊ शकतो असा विचारदेखील कोणी केला नसेल एवढे मात्र नक्की.
व्हिडीओ पाहून शाळेचे आठवले दिवस
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ( Viral Video) @hiranya_3070 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून शाळेचे दिवस आठवले आहेत. काही जण या चिमुकल्यांचा डान्स स्टेप्स पाहून पोट धरून हसत आहेत; तर अनेक जण त्यांना सुपर क्युट म्हणत आहेत. त्याचप्रमाणे काही पालक आमची मुलंदेखील याच शाळेत आहेत, असेसुद्धा आवर्जून कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.