Viral Video Shows Children Got emotional support : रस्त्यावरील भटके श्वान माणसांवर हल्ला करतात ही गोष्ट जरी खरी असली तरीही पाळीव श्वान घरातील प्रत्येक सदस्यावर खूप जीव लावतो, त्याची काळजी घेतो, घराचं रक्षण करतो हे नाकारूनही चालणार नाही. त्यामुळेच अलीकडे श्वान पाळण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषत: कुत्रा, मांजर पाळण्याचं प्रमाण शहरी भागात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video ) होत आहे. त्यामध्ये वाळूत हळूहळू चालणाऱ्या चिमुकल्याला श्वान मदत करतो आहे.

समुद्रकिनारी गेल्यावर लहान मुलांना खूपच मज्जा वाटते. वाळूत, पाण्यात खेळण्याचा त्याचा अनुभव काहीतरी अनोखाच असतो. तर, आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या वाळूमध्ये श्वान व चिमुकला, असे दोघे उभे आहेत. तितक्यात चिमुकला इवल्याशा पायांनी वाळूत चालण्याचा प्रयत्न करू लागतो. पण, वाळूत एकेक पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्याला स्वतःच तोल सावरता येत नसतो. मग अशा वेळी नेमकं श्वान काय करतो ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) बघा…

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल
Viral Video Shows Pet Dog Wants To Ride
‘मम्मी प्लिज मला चढू दे…’ जत्रेत राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाचा हट्ट, मालकिणीने केला ‘असा’ पूर्ण; पाहा Viral Video
Dogs Killed
Dogs Killed : अमानवी कृत्य… कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून पुलावरून फेकून दिलं; २१ श्वानांचा मृत्यू, २१ गंभीर
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम

हेही वाचा…“म्हणूनच मला मुंबई आवडते… ” बॅगमधून डोकावणाऱ्या मिन्नीला पाहून प्रवासी झाले खूश; VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

व्हिडीओ नक्की बघा…

श्वान जगातील सर्वांत सुंदर जीव…

व्हायरल व्हिडीओत (viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, वाळूत एकेक पाऊल टाकत चिमुकला चालण्याचा प्रयत्न करतो; पण स्वतःचा तोल सावरता येत नसल्यामुळे तो पडणार असतो तितक्यात श्वान त्याच्या हाताखाली जाऊन उभा राहतो आणि त्याला आधार देतो. पुन्हा चिमुकला दोन पावलं पुढे जातो तेव्हा श्वानदेखील त्याला आधार देण्यासाठी पुढे जातो हे पाहून तुम्हालाही नवल वाटेल एवढं नक्की. मुक्या प्राण्यांना बोलता येत नसलं तरीही कोणाला, केव्हाही मदतीची गरज लागली तेव्हा ते त्यांच्या कृतीद्वारे मदत करून त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @briefintel या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. श्वानाची ही कृती पाहून नेटकरी कौतुकाचा वर्षाव करताना टाळ्या वाजवण्याच्या इमोजीसह त्यांच्या भावना कमेंट्समधून व्यक्त करताना दिसत आहेत. त्याचबरोबर एका युजरने कमेंट केली आहे की, असे व्हिडीओ बघण्यासाठी आम्ही मोबाईलमध्ये रिचार्ज करतो. दुसरा म्हणतोय की, श्वान हा जगातील सर्वांत सुंदर जीव आहे. तिसरा म्हणतोय की, सुख-दुःखांत साथ देणारा आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader