Viral Video : लहान मुलांसाठी बिल्डिंग किंवा चाळीतल्या एका कार्यक्रमात, नवरात्रीमध्ये व शाळेतही फॅन्सी ड्रेस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात लहान मुलांसाठी एक खास वस्तू, पदार्थ वा एखादे प्रसिद्ध व्यक्तीचे पात्र ठरवून, त्यानुसार त्यांची वेशभूषा करावी लागते. वेशभूषा स्पर्धा, तसेच शाळेत किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी मुलांना विशिष्ट वस्तू अथवा व्यक्तीचे मनोगत व्यक्त करावे लागते. पण, काही मोजकीच मुले स्टेजवर जाऊन न घाबरता उत्तम सादरीकरण करतात, तर काही मुले संकोचतात. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत आहे. त्यामध्ये एका चिमुकल्याने कोणताही अभिनय तर केला नाही; पण त्याच्या उपस्थितीनेच अनेकांची मने जिंकली.
व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. शिवाय नावाचा चिमुकला हनुमान बनलेला असतो. त्याने पहिल्यांदाच फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात सहभाग घेतलेला असतो. लाल रंगाची धोती, मागे शेपूट, डोक्यावर मुकुट, बाजूबंद, काही दागिने, ओठांना लाल रंग आदी अनेक गोष्टी घालून चिमुकला हनुमानाच्या वेशभूषेत स्टेजवर येऊन उभा असतो. त्यानंतर एक महिला येऊन, त्याला गदा देण्याच्या प्रयत्न करीत असते. पण, चिमुकला त्यावेळी कशी प्रतिक्रिया देतो हे एकदा नक्की व्हायरल व्हिडीओतून ( Viral Video) बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, एक महिला येऊन त्याला गदा देत असते. पण, तो अगदी मजेशीर पद्धतीने हूं (Uh uhh) असा आवाज काढून, गदा घेण्यास नकार देतो. मग ती महिला गदा स्टेजवर ठेवून निघून जाते आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. त्यानंतर चिमुकला उपस्थितांकडे बघून, पुन्हा हूं (Uh uhh ) असा आवाज काढतो आणि पुन्हा सगळे जोरजोरात हसू लागतात. कोणताही डायलॉग किंवा अभिनय न करता, त्याच्या ‘क्युटनेस’ने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याचप्रमाणे शिवाय या चिमुकल्याला दुसरे बक्षीससुद्धा देण्यात आले आहे.
मला खरी गदाच पाहिजे…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shivay_rising_star_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. तर काही जण “मला खरी गदाच पाहिजे”, “Uh uhh काय करतो आहेस”, खूप मजेशीर आणि नैसर्गिक व्हिडीओ” आदी अनेक कमेंट्स व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच @shivay_rising_star_ या अकाउंटवर चिमुकला शिवायचे अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.