Viral Video : शाळेत जाण्यापूर्वी लहान मुलांना ज्युनियर केजी, बालवाडीमध्ये घातले जाते. मुलांना लिहिता, वाचता, बोलता यावं यासाठी हा प्रयत्न असतो. पण, अनेकदा हे शिक्षक या सगळ्या चिमुकल्यांना कसं सांभाळत असतील,असाही प्रश्न आपल्या सगळ्यांना नेहमीच पडतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रशिक्षण सत्रादरम्यान नर्सरी शिक्षक गाण्याची तालीम करताना दिसत आहेत. पण, ज्या गाण्याची तालीम महिला शिक्षकांकडून करून घेतली जात आहे; त्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) एका वर्गातील आहे. काही प्रशिक्षक शाळेत निरीक्षणासाठी आलेले दिसत आहेत. सगळ्या महिला शिक्षकांनी एकसारख्या निळ्या रंगाच्या साड्या नेसल्या आहेत. एक महिला शिक्षिका ‘आहा, टमाटर बड़े मजेदार’ हे गाणं गाण्यास सुरुवात करते. त्यानंतर बाकीच्या शिक्षिका तिच्या गाण्याला साथ देताना दिसतात. बहुतेक नर्सरीच्या शिक्षकांकडून सराव करून घेतला जात आहे. नक्की शिक्षकांचा सराव कसा करून घेतला जात आहे ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘हीच तर संस्कृती…’ डॉक्टर बाळ घेऊन येताच आजी-आजोबांनी धरले पाय अन्…; VIRAL VIDEO चा शेवट जिंकेल तुमचं मन

व्हिडीओ नक्की बघा…

आहा टमाटर बड़े मजेदार :

व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, महिला शिक्षिकांचा सराव घेतला जात आहे. ‘आहा, टमाटर बडा माजेदार’ हे गाणं त्या स्टेप्स व हावभाव यांच्यासह आलेल्या प्रशिक्षकांसमोर सादर करून दाखवतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी “तो बच्चों, आप सब टमाटर खायेंगे ना? (म्हणजे मुलांनो, तुम्ही सगळे टोमॅटो खाणार आहात ना?)” ते स्वतःलाच उत्तर देतात, “होय मॅडम”, अशा रीतीने मुलांना शिकवण्याबाबतचा सराव सुरू आहे, जे पाहून तुम्हाला महिला शिक्षकांचे कौतुक वाटेल आणि हसूसुद्धा येईल एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ डॉक्टर नितीन शाक्य यांच्या @drnitinshakya_sdm या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच टाळ्या वाजवणाऱ्या इमोजीसह ‘नर्सरी शिक्षक उत्कृष्ट प्रशिक्षण घेत आहेत,’ अशी कॅप्शन देत त्यांनी नर्सरी शिक्षकांचे कौतुक केले. पण, सोशल मीडियावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही जण म्हणत आहेत की, हे खूप कौतुकास्पद आहे; तर अनेक जण हे व्हायरल गाणे अभ्यासक्रमात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.

लहान मुलांना टोमॅटोचे महत्त्व आणि अर्थ समजावून सांगण्यासाठी हे परिश्रम घेतले जात आहेत; जेणेकरून मुलांना टोमॅटोचे फायदे सहज समजावेत. त्यामुळे शिक्षक स्वत:च या गाण्याचे प्रशिक्षण त्यांना शिकविण्यापूर्वी घेताना दिसतात. ‘आहा टमाटर बड़े मजेदार’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होते. त्यावर अनेक रील व्हिडीओसुद्धा बनविण्यात आले आहेत.