Duck And Her Ducklings Cross A Busy Road : आजच्या काळात काहीच अशक्य नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आजकाल लोक काहीही शक्य करून दाखवतात. सध्या समोर आलेली एक बातमीही अशीच आहे. ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखादा वाहतूक पोलीस असं कसं करू शकतो. तुम्ही सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ अतिशय खास आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वाहतूक पोलिसाचंही कौतुक केलं आहे.

प्राण्यांच्या अपघातांच्या घटनांमध्येही मागील काही काळापासून वाढ झाली आहे. कधी रस्त्यावरील अपघातात तर कधी रेल्वे अपघातात अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. जितका त्रास माणसांना होतो तितकाच मुक्या जीवांनाही होतो. त्यामुळे प्राणी आणि माणसात भेदभाव का करायचा? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीेओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं, की एक वाहतूक पोलीस गाड्या थांबवून बदकाच्या कुटुंबाला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात दिवंगत वडिलांचा जिवंत भासणारा पुतळा पाहून नवरीला अश्रू अनावर, सारेच जण भावूक

बदकाचं हे कुटुंब रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या किनाऱ्यावर उभे असतात. हे पाहून ट्रॅफिक पोलीस त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी वाहतूकच थांबवली. रस्त्यावरच्या गाड्या थांबल्यानंतर बदक आणि त्याच्या मागून त्याचे पिल्ले एका रांगेत आपल्या इवल्या इवल्याश्या पायांनी आरामात चालत रस्ता ओलांडतात. ज्यावेळी बदक आणि त्याचे पिल्ले रस्ता ओलांडत असतात त्यावेळी ट्रॅफिक पोलीस सुद्धा त्यांच्यासोबत चालू लागतो. असे दृश्य फार कमी दिसून येतात. काही लोकांसाठी ही मदत केवळ टाईमपास असू शकतो. पण हीच खरी माणूसकी होय. प्रत्येक माणसाला दुसऱ्यांची निस्वार्थी मदत केली पाहिजे, मग तो माणूस असो वा मग प्राणी.

आणखी वाचा : तीन बहिणींच्या चिमुकल्या भावाचा हा गोंडस VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रस्त्यावरची ट्रॅफिक पाहून हत्तीचा राग अनावर, त्यानंतर जे घडलं ते या VIRAL VIDEO मध्ये पाहा

केवळ तुमची दया आणि एक सुंदर उदाहरण. हा व्हिडीओ licsu नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १० मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ ८ लाख ८९ हजार लोकांनी लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

Story img Loader