Married Couple Dances On Jise Dekh Mera Dil Dhadka Song : ‘फूल और कांटे’मधील अनेक गाणीही आजही लोकप्रिय आणि लोकांना तोंडपाठ आहेत. त्याच चित्रपटातील एक अगदी प्रसिद्ध ‘कॉलेज की लडकी’ हे गाणे लागताच प्रत्येक जण त्याच्यावर ठेका ठरतो. आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा (Video) हेच दृश्य पाहायला मिळाले आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. पण, या कार्यक्रमात नवरदेव आणि नवरी राहिले बाजूला; पण एका जोडप्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्यक्रमात ‘कॉलेज की लडकी’ हे गाणे वाजते आणि मग एक व्यक्ती डान्स करण्यास सुरुवात करते.
‘फूल और कांटे’मधील अनेक गाणीही आजही लोकप्रिय आणि लोकांना तोंडपाठ आहेत. त्याच चित्रपटातील एक अगदी प्रसिद्ध ‘कॉलेज की लडकी’ हे गाणे लागताच प्रत्येक जण त्याच्यावर ठेका ठरतो. आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा (Video) हेच दृश्य पाहायला मिळाले आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. पण, या कार्यक्रमात नवरदेव आणि नवरी राहिले बाजूला; पण एका जोडप्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्यक्रमात ‘कॉलेज की लडकी’ हे गाणे वाजते आणि मग एक व्यक्ती डान्स करण्यास सुरुवात करते.
व्हिडीओ नक्की बघा…
नात्यात गोडवा राहतो आणि जोडीदारही खूश होतो
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, हळदीच्या कार्यक्रमासाठी अनेक जण उपस्थित आहेत. पण, या सगळ्यात एक जम ‘कॉलेज की लडकी’ गाण्यावर नाचण्यास सुरुवात करतो. त्यानंतर तो बायकोचा हात धरतो आणि सर्वांसमोर गाण्याद्वारे आपले प्रेम व्यक्त करतो. हे पाहून बायकोसुद्धा खुश होते आणि दोघेही गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतात आणि हा कार्यक्रम आणखीन खास होऊन जातो, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्याने नात्यात गोडवा राहतो आणि जोडीदारही खूश होतो.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lifeiss._meme या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जर आपल्या नात्याचा शेवट या जोडप्याप्रमाणे होणार नसेल, तर मला हे नातं नको’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्या दोघांनी ट्विनिंगसुद्धा केलं आहे (एकाच रंगाचे कपडे घातले आहेत) हे पाहूनही काही नेटकरी कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.