Video Shows Man Feed Food To His Store First Customer Cow : गावाकडच्या लोकांसाठी प्राणी म्हणजे अगदी देवासमान असतात. गाय, बकरी दुधाचा व्यवसाय चालवण्यास मदत करतात; तर बैल शेतात काम करताना शेतकऱ्यांना हातभार लावतात. बैलगाडी एका गावातून दुसऱ्या गावात ऊस वाहून नेण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. तर, अंडी आणि चिकनच्या व्यवसायाला कोंबड्यांमुळे मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. त्यामुळे गावाकडच्या जीवनात कुठलाही पाळीव प्राणी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे प्रत्येक गावकऱ्याच्या घरात एखादा तरी प्राणी पाळलेलाच असतो.
तर आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये इन्स्टाग्राम युजर @iti_snacks_wala ने त्याचा नवीन व्यवसाय सुरू केलेला असतो. शुभ संकेत म्हणून की काय एक पाहुणी दररोज त्याच्या दुकानात येते. एवढेच नाही, तर रोज एकाच वेळेला येते. तेव्हा दुकानदाराकडे जे उपलब्ध असते, ते तो या पाहुणीला खायला देतो. पण, नक्की ही पाहुणी कोण आहे, जी दुकानात दररोज न चुकता येते हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
पहिला प्रसाद ३३ कोटी देवांना (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा @iti_snacks_wala इन्स्टाग्राम युजर दुकान उघडतो. तेव्हा गाय हळूहळू चालत त्याच्या दुकानापाशी पोहोचते. त्यानंतर दुकानदार आपल्या नेहमीच्या ग्राहकांसाठी ब्रेड पाकिटातून काढत असतो; तर दुसरीकडे गाय अगदी दुकानदार कधी खायला देतोय याची वाट पाहते. दुकानदार ब्रेड काढतो आणि गाईला खायला देतो. गाय दररोज दुकानात उघडताच हजेरी लावते हे पाहून एके दिवशी त्याने या गोष्टीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @saahilsays_ आणि @iti_snacks_wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘तसेच माझ्या दुकानात हजेरी लावणारा पहिला ग्राहक’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आणि “भावा, तू अख्खं ब्रेडच पाकीट देत जा गाईला आणि मला क्यूआर पाठव”, “पहिला प्रसाद ३३ कोटी देवांना”, “दिवसाची सुरुवात खूप चांगली करतोस भावा”, “निरागस ग्राहक आहे. पैसे नाही देऊ शकला तरी मनाने आशीर्वाद नक्कीच देत असणार”, “पाणी ठेवा उन्हाळा आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहेत.