Video Viral: जेव्हा पक्षी घरटे बनवतात तेव्हा ते झाडांवरून लहान काड्या गोळा करतात. एवढेच नाही तर घरटे मजबूत करण्यासाठी लहान काड्यांसोबतच गवताचे तुकडे किंवा तारांचाही वापर केला जातो. साधारणपणे, पक्षी कापड, सुतळी, केस किंवा इतर मऊ साहित्य निवडतात, परंतु सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्यर्च वाटेल. एका कावळ्याने घरट्यासाठी चोचीत अशी वस्तू ठेवली होती, जी पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. होय, कावळ्याने हरणाच्या शेपटीची फर काढली आणि मग ती आपल्या घरट्यात नेली.
असे म्हटले जाते की कावळ्यांना त्यांचे घरटे बांधण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतात. ते त्यात अंडी घालतात आणि अंड्यातून पिल्ल बाहेर येऊन उडण्यास सक्षम झाल्यानंतर घरट सोडतात. काही पक्षी कधीकधी घरटे बांधण्यासाठी प्राण्यांची फर किंवा केस वापरतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कावळा आपल्या घरट्यासाठी हरणाच्या शेपटीचे फर चोरत आहे. इन्स्टाग्रामवर ‘नेचर’ पेजने कॅप्शनसह व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला घरटे बनवण्यासाठी ही फर हवी आहे. धन्यवाद साहेब.’
(हे ही वाचा: KGF Chapter 2: रॉकी भाईची क्रेझ; थेट लग्नपत्रिकेवरच छापला सिनेमाचा डायलॉग!)
व्हिडीओमध्ये एक हरिण एका बेंचजवळ आणि काही झाडांवर बसलेले दिसत आहे. हरिण जंगलाकडे बघत आहे आणि अचानक एक कावळा त्याच्या मागे येतो. कावळा हरणाची शेपटी उचलतो आणि त्याच्या चोचीने फरचा गुच्छ पकडतो. तर हरण हलण्याची किंवा मागे वळून पाहण्याचीही पर्वा करत नाही. कावळा हे एकदा नाही तर अनेक वेळा करतो.
(हे ही वाचा: अजगराने अचानक गायीच्या वासरावर केला हल्ला, पाय पकडला आणि…; बघा Viral Video)
(हे ही वाचा: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल! देसी जुगाड बघून नेटीझन्स झाले आश्चर्यचकीत)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओला १ लाख ६० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि सुमारे १६ हजार लाइक्स मिळाले आहेत.