Dad And Son Viral Video : आपल्याला शाळेत असताना बाबांविषयी निबंध लिहायला दिला जायचा. तेव्हा आपल्या वयाला साजेशा अशा ‘बाबा लाड करतात, खेळतात’ आदी अनेक गोष्टी लिहिल्याचे तुम्हाला स्मरत असेल. पण, त्यांनी आपल्यासाठी केलेला त्याग, त्यांच्या मनात दडलेले प्रेम, आपल्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे त्यांचे दुसरे रूप आपण मोठे झाल्यावर कळते. म्हणूनच बाबांचे फक्त आपल्या आयुष्यात असणे किती महत्त्वाचे असते हे अगदी एका वाक्यात किंवा एका शब्दात सांगणे कठीण असते. तर आज असेच काहीसे सांगणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत (Video) रस्त्याकडेला बाबा आणि त्यांचा चिमुकला बसलेला दिसत आहे. बाबा आपल्या चिमुकल्याला घेऊन डबा खाताना दिसत आहेत. चिमुकलादेखील आपल्या बाबांच्या बाजूला बसून त्यांच्याबरोबर जेवतो आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला खाऊ घालायचेय म्हणून बाबा रस्त्याकडेला एक जागा शोधून अन्नाचे सेवन करतो आहे, जे एका अनोळखी व्यक्तीने पाहिले आणि त्याने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेण्याचे ठरवले. एकदा बघाच बाबा-लेकाचा हा व्हायरल व्हिडीओ.

व्हिडीओ नक्की बघा…

बाबा म्हणजे घरातील प्रत्येकाचा आधारस्तंभ असतो. कोणत्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा हे त्यांना अगदी अचूक माहिती असते. समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा विचार करणारे फक्त बाबाच असतात. आज त्या व्यक्तीच्या मोठेपणाची जाणीव करून देणारे उत्तम उदाहरण व्हिडीओत (Video) पाहायला मिळाले आहे. बाबा आपल्या चिमुकल्याला घेऊन रस्त्याकडेला अन्न ग्रहण करताना दिसले आहेत. हे पाहून अनोळखी व्यक्तीने त्या दृश्याचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. ‘आपल्या बाबांनी आपल्यासाठी काय केले हे बाबा झाल्याशिवाय किंवा बाबा गेल्याशिवाय कळत नाही’, अशी हृदयविदारक कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

ज्याच्याबद्दल बोलायला शब्द नसतात तो असतो बाप…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @aaaadya_96 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि ज्याच्याबद्दल बोलायला शब्द नसतात तो असतो बाप, बाप असतो तेव्हा बोलायला शब्द नसतात आणि जातो तेव्हा त्याचे महत्त्व सांगता येईल यासाठी पुरेसे शब्द मिळत नाहीत, परिस्थिती खूप काही शिकवते, बाप कसाही असला तरी त्याच असणं आवश्यक आहे, अगदी खरं बोललास आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.