Viral Video Shows Father’s Love : ठेच लागली की ‘अगं आई’ तर संकट संकट आले की ‘अरे बापरे’ असे शब्द तोंडातून निघतात. कारण – संकटाच्या काळात कुटुंबच आपल्या पाठीशी उभे राहते. आईचे प्रेम आभाळभर असले तरीही वडिलांचेही मन कुटुंबाशिवाय कुठेही रमत नाही. घरातील एखादा तरी सदस्य कुठे बाहेर गेला की, घरात येईपर्यंत त्यांना खूप काळजी लागून राहते. आयुष्यात काय हवे आणि काय नको यासाठी बाबाच दिवस-रात्र कष्ट करत असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या गोष्टींचे उपकार म्हणा किंवा कर्ज फेडणे जणू या जन्मात तरी कठीण आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असेच काहीसे दाखवणारा आहे.

व्हायरल व्हिडीओ २२ मार्च २०२५ चा आहे. लेकीने एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेला दिसतो आहे. लेकीचा हा खास कार्यक्रम पाहण्यासाठी बाबांनीसुद्धा हजेरी लावली आहे. सगळ्या प्रेक्षकांमध्ये एकटे उठून बाबा व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतात. लेक डान्स करण्यात मग्न असते, तर प्रेक्षकांमध्ये बसलेले बाबा तिचा हा खास क्षण मोबाईलमध्ये टिपून घेण्यास मग्न झालेले दिसत आहेत. बाबा आणि लेकीचे नाते कसे असते हे दाखवणारा व्हिडीओ एकदा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, बाबा न लाजता, सर्व बसलेल्या प्रेक्षकांमध्ये एकटे उभे राहून आपल्या लेकीचा व्हिडीओ शूट करीत आहेत. हे प्रेक्षकांमध्ये उपस्थित एका अनोळखी व्यक्तीने पाहिले आणि त्यांचा तो व्हिडीओ शूट करून घेतला आणि ‘काही कर्ज कधीच फेडता येत नाहीत, त्यातील एक म्हणजे वडिलांचे प्रेम’, असा मजकूर व्हिडीओवर लिहून शेअर केला आहे.

त्यांच्या घामाचा एक थेंबही फेडता येत नाही…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ishq_e_motihari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘या जगात मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा जास्त कोणीही प्रेम करू शकत नाही’,अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. तर नेटकरीसुद्धा बाबांचे प्रेम काय असते हे त्यांच्या शब्दांत सांगत आहेत आणि बाप म्हणजे ते महान व्यक्तिमत्त्व ज्यांच्यासाठी घामाचा एक थेंबही फेडता येत नाही, तुम्ही काहीही म्हणा, प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी कमी पडेल अशा कमेंट्स वडिलांसाठी, तर व्हिडीओ काढून प्रत्येकापर्यंत बाबाचे प्रेम पोहचवणाऱ्यालासुद्धा कौतुकाची थाप देताना नेटकरी दिसून आले आहेत.