Video Shows Dad Congratulate His Daughter In Special Style : बाबा आणि लेक यांचे नाते शब्दात मांडणे कठीण आहे. लेकीने एखादी गोष्ट मार्केटमधून आणायला सांगितली की, बाबा अगदी तिला खाऊन कंटाळा येईल एवढ्या प्रमाणात तो पदार्थ घेऊन येतात. लेकीने हट्ट केल्यावर बाबा लेकीसाठी आईकडून परवानगी घेतात. घरात भांडण झालं की, जेवणावर राग काढणाऱ्या लेकीला समजून काढायला सुद्धा जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये बाबांचे लेकीवर असणारे प्रेम पुन्हा एकदा वेगळ्या रूपात पाहायला मिळाले आहे.

इन्स्टाग्राम युजर कल्याणीने कदाचित नवीन दुकान खरेदी केलेले असते. तर या दुकानाचे काम सुरु असते. तर लेकीला न सांगता तिचे वडील आज पहिल्यांदा दुकानाचे काम किती झाले हे पाहायला आले. बाबा दुकान बघायला पहिल्यांदांच आले हे पाहून लेक सुद्धा त्यांच्या शेजारी येऊन उभी राहिली. आपल्या लेकी स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार या कौतुकाने त्यांची स्वतःचा मोबाईल काढला आणि नक्की काय केले हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

डोळ्यांत अश्रू आणणारा क्षण (Viral Video) :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, बाबा लेकीचे नवीन दुकान बघायला गेलेले असतात. तिथे पोहचताच फक्त दुकान बघत नाहीत तर कौतुकाने ते स्वतः चा मोबाईल काढतात आणि फोटो काढण्यास आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतात. हे पाहून लेक सुद्धा खुश झाली आणि तिने हा क्षण स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद करून घेतला आणि ‘न बोलताच सगळ काही बोलणारे असतात ते म्हणजे वडील’ ; असा मजकूर तिने भावुक होऊन व्हिडीओवर दिला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kalyani_creation आणि @kalyaniranjit21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘लेकीच्या यशाचा क्षण कॅमेरामध्ये टिकताना एक वडील’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी कल्याणीचे कौतुक करत आहेत आणि ‘ एकाचवेळी गालावर हसू अन् डोळ्यांत अश्रू आणणारा हा क्षण आहे’, ‘असे कौतुक बाबांनी करणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.