Video Shows Daughter Gift Something Special To Her Father : प्रत्येक बाबांना त्यांचं मुलं एक जबाबदार आणि यशस्वी व्यक्ती म्हणून मोठं झालेलं पाहायचं असतं. त्यांना आपला मुलगा किंवा मुलगी घरी पगार देईल अशी अपेक्षा तर नसते. पण, त्यांनी स्वतःचे हक्काचे पैसे कमवावे, स्वतःची गाडी, घर घ्यावे अशी आशा असते. पण, ही मुले देखील कमाल असतात. मुलं कमवायला लागल्यावर सगळ्यात पहिला आई-बाबांच्या गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत इन्स्टाग्राम युजर साध्वी यादवच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. बाबांना बऱ्याच वर्षांपासून एक साऊंड सिस्टम खरेदी करायचा होता. पण, त्यांनी त्याकडे कधी लक्षच दिले नाही. मग लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आई-बाबा बाहेर गेल्यावर ती साऊंड सिस्टम घरात लावून ठेवते आणि त्यावर ‘गुलाबी साडी’ हे गाणे लावते. आई-बाबांची घरात एंट्री होते. बाबांना सुरवातीला वाटते की, असंच नेहमीप्रमाणे फक्त गाणी लावून ठेवली आहेत. पण, साऊंड सिस्टम बद्दल समजल्यावर त्यांचे हावभाव कसे असतात व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

https://www.instagram.com/p/DHbETjpt0Yu

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आई-बाबांची घरात एंट्री होते. तेव्हा लेकीने बाबांसाठी आणलेल्या नवीन साऊंड सिस्टमवर ‘गुलाबी साडी’ हे गाणे लावलेले असते. बाबांना सुरवातीला कळत नाही. पण, जेव्हा त्यांचे लक्ष नवीन साऊंड सिस्टमवर जाते. तेव्हा मात्र त्यांचा आनंद गगनात मावत नाही. ते लेकीचा हात हातात धरून तिला ‘थँक यू’ म्हणताना दिसतात. असे एकदा नाही तर अनेकदा लेकीचे आभार मानून आनंद व्यक्त करताना दिसतात, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची मला संधी देवो (Viral Video)

२ ते ३ शर्टमध्ये वर्ष काढणारे बाबा स्वतःची आवड-निवड बाजूला ठेवून कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्याच्या मागे असतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून मुलं सुद्धा त्यांच्या आवडी-निवडी पूर्ण करण्याचा हट्ट करतात जे आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sonpapdii_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘त्यांना माझा खूप अभिमान वाटला आणि देव त्यांना आशीर्वाद देवो, त्यांनी पाहिलेले सर्व स्वप्ने मला पूर्ण करण्याची आणखी संधी देवो’ ; अशी कॅप्शन लेकीने व्हिडीओखाली लिहिली आहे.