Video Shows Daughter Gift Her Father To His Dream Car : असे म्हणतात की, बाबांना मिठी मारायला मुलीला तिच्या पाठवणीच्या दिवसाची तर मुलाला यशस्वी होण्याची वाट पाहावी लागते. आईबरोबर आपण मैत्रीचे नाते निर्माण करतोच, पण बाबांबरोबर मैत्रीचे नाते निर्माण करणे थोडे कठीणच जाते, त्यामुळे काही जणांच्या मनात बाबांविषयी प्रेम असले तरीही अगदी त्यांच्याशी बोलताना, त्यांना फादर्स किंवा अगदी वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा शुभेच्छा देताना दहा वेळा विचार करावा लागतो. पण, आज सोशल मीडियावर दोन्ही मुलांनी मिळून, हिंमत करून त्यांच्या बाबांची एक जुनी इच्छा पूर्ण केली आहे.

बाबा ऑफिसवरून घरी येतात. याआधीच त्यांच्या मुलांनी मिळून खास सरप्राईज प्लॅन केलेला असतो. एक वर्षापूर्वी बाबा आणि त्यांची मुलगी शोरूममध्ये बाईक घ्यायला गेलेले असतात. पण, ही बाईक तेव्हा त्यांना घेता आलेली नसते. तर हेच लक्षात ठेवून अगदी एक वर्षानंतर मुलीने बाबांसाठी ती बाईक विकत घेतली आहे आणि बिल्डिंगखाली पार्क केली आहे. बाबा येताच मुले त्यांच्या हातात चावी देतात आणि मग बाबांचे हावभाव कसे बदलतात ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

अरे हे तर स्वप्न होतं माझं (Viral Video ) :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, सगळ्यात आधी मुलगी बाबांच्या हातात खेळण्यातील खोटी बाईक देते. मग त्यानंतर नवीन खरेदी केलेल्या बाईकची चावी त्यांच्या हातात देते. ‘आता ही कोणती बाईक’ असे बाबा आश्चर्याने विचारतात. त्यानंतर लेक बाईककडे बोट दाखवते आणि मग बाबा थेट बाईकवर जाऊन बसतात आणि ‘बाईक तो मस्त है ड्रीम था मेरा’ (बाईक मस्त आहे, स्वप्न होतं माझं ) असे म्हणतात आणि लेकीला आपल्या ड्रीम बाईकवर बसवून फिरायला घेऊन जातात.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @s8ullaughgags या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बाबांना त्यांची ड्रीम बाईक गिफ्ट केली’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनासुद्धा हा व्हिडीओ भरपूर आवडला आहे आणि ते ‘एक दिवस मीपण माझ्या आई-वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करेन’, ‘त्यांचे स्वप्न होते, जे त्यांना बोलता येत नव्हते’, ‘प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांकडून अशा प्रकारच्या सरप्राईज मिळायला हव्यात’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.