video Shows father and daughter sweetest bond : लेक आणि वडिलांचे नाते हे जगातील सगळ्यात सुंदर नातं असते. मुलांना कायम सगळ्यात पहिला आपल्याला एक गोंडस मुलगी जन्माला यावी असे वाटत असते. तर याउलट मुलींना कायम त्यांच्या बाबांसारखा जोडीदार मिळावा, अशी इच्छा असते. त्यामुळेच की काय हे नाते काळ बदलला तरीही आजही तसेच आहे. तर, आज सोशल मीडियावर बाबा-लेकीचं नातं कसं असतं, हे दाखविणारा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये बाबा आणि लेकीचा एक खास क्षण कॅप्चर केला आहे…
व्हायरल व्हिडीओ ट्रॅफिक दरम्यानचा आहे. प्रचंड गाड्यांची गर्दी दिसते आहे. यासगळ्यात बाबांबरोबर एक चिमुकली बाईकवर बसलेली दिसते आहे. दिवसेंदिवस प्रचंड गरमी वाढत चालली आहे. तर यादरम्यान बाबा लेकीला शाळेतून घरी घेऊन जात असतात. पण, भर उन्हात बाबा बाईक चालवत असतात, हे पाहून लेक त्यांची काळजी करण्यास सुरुवात करते. लेक एका हातात हँड फॅन हातात घेऊन बाबांच्या केसाला हवा घालते, तर दुसरा हाताने केस कुर्वाळताना दिसते आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
मुलांना मुलगी का हवी असते याचे आणखी एक कारण (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, अनेकदा मुलांना विचारल्यावर मला पहिले मुलं म्हणून मुलगीच हवी असे अनेकदा ते आवर्जून म्हणताना दिसतात. कारण – लेक ही बाबांची लाडकीच असते. त्यांनी न सांगितलेल्या गोष्टी सुद्धा ती ओळखते, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी बाबांना आणू देते. अर्थातच आपल्या बाबांसाठी चिमुकली काहीही करायला तयार असते. म्हणूनच बाबांना आपल्या आई, बायकोप्रमाणे जीव लावणारी मुलगी हवी असते, ज्याचे आणखीन एक उदाहरण या व्हिडीओत पहायला मिळाले आहे.
व्हिडीओ नक्की बघा
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @walkwithtusher या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मुलांना पहिले मूल म्हणून मुलगी का हवी असते याचे आणखी एक कारण’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून बाबा आणि लेकीच्या नात्याचे त्यांच्या शब्दात वर्णन करताना दिसत आहेत आणि आम्ही सुद्धा आमच्या बाबांबरोबर असेच करायचो असे आवर्जून कमेंटमध्ये सांगताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.