Video Shows Daughter Share Parents First Flight Experience : आई-बाबा आपल्या मुलांना खूप कष्ट करून वाढवतात, त्यांना चांगले संस्कार देतात, आपल्या मुलांच्या यशस्वी जीवनासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. तसेच या सगळ्या गोष्टींची जाणीव त्यांच्या मुलांनासुद्धा असते. त्यामुळे तेही आई-बाबांचे कष्ट पाहून त्यांना प्रत्येक सुख देण्याच्या प्रयत्नात असतात. कामाला लागल्यावर पहिला पगार, घरात पहिली गाडी ते त्यांनी कधी न अनुभवलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी करताना दिसून येतात. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. तरुणी पहिल्यांदा तिच्या आई-बाबांना विमानात घेऊन गेली आहे.

पहिले नेहमीच खास असते, असे म्हणतात. पहिले प्रेम, पहिला पाऊस, शाळा-कॉलेजचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिले घर आणि सगळ्यात खास म्हणजे पहिला विमान प्रवास. या सर्वच गोष्टी पहिल्यांदा केल्यावर त्याचा अनुभव, त्याचे सुख काहीतरी वेगळेच असते. तर आज इन्स्टाग्राम युजर अंकु महेंद्रकरने तिच्या आई-बाबांचा पहिला विमान प्रवास व्हायरल व्हिडीओद्वारे दाखवला आहे. आई-बाबांबरोबर ती स्वतःसुद्धा विमानातून प्रवास करते आहे. तिच्या आई-वडिलांचा पहिला विमान प्रवास व्हिडीओतून (Video) बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, तिकीट दाखवून आई-बाबा विमानात चढतात. त्यानंतर खिडकीजवळ आई, नंतर मुलगी आणि मग तिचे बाबा बसतात. विमानात बसेपर्यंत प्रत्येक क्षण तरुणी तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेते आणि त्यानंतर ती आई-बाबांचे खिडकीजवळील सीटजवळ बसून फोटोसुद्धा काढते. यादरम्यान पहिल्यांदा विमानात बसण्याचा आणि लेकीने आपले स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद तरुणीच्या आई-बाबांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट दिसून येईल.

आई वडिलांची पहिली विमान यात्रा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ankiee_makeup_academy’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘माझ्या आई-वडिलांची पहिली विमान यात्रा… ‘ अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. तिने विमान प्रवासाचे आणखीन काही व्हिडीओ आणि फोटोसुद्धा शेअर केले आहेत. तसेच नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ आणि फोटो पाहून तरुणीचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

Story img Loader