Video Shows Daughter Dance For Father : मुलगा असो की मुलगी, दोघांची ओळख त्यांच्या बाबांशी असते. सण-उत्सवाला, कुटुंबातील सर्व सदस्यांना नवीन कपडे आणल्यानंतर, जो स्वतः सर्वांत जुना शर्ट घालतो ती व्यक्ती म्हणजे बाबा. बाबा असणे म्हणजे आपल्या घरावर छत असण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे ऊन, पाऊस, वादळ यांपासून घराचे छत आपले रक्षण करते, त्याचप्रमाणे बाबासुद्धा सगळी संकटे स्वतः सहन करतो आणि आपल्याला फक्त आनंद कसा मिळेल यासाठी कायम प्रयत्नशील असतो. तर आज सोशल मीडियावर बाबांचे आयुष्यातील महत्त्व डान्सद्वारे पटवून देणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) एका कौटुंबिक कार्यक्रमात बाबांच्या तीन मुली आलिया भट्टच्या राझी सिनेमातील ‘दिलबरो’ (Baba Main Teri Malika) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. बाबा आणि आईला सोफ्यावर बसवून तिन्ही मुली डान्स करण्यास सुरुवात करतात. त्यानंतर गाण्यातील प्रत्येक ओळ आणि गाण्याच्या ओळीवर मुलींच्या डान्स स्टेप्स पाहून आईने डोळ्यांतून येणारे अश्रू थांबवून मुलींना टाळ्या वाजवीत प्रोत्साहन दिले. पण, हा डान्स पाहून बाबांनी कशी प्रतिक्रिया दिली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

जेव्हा तुम्ही तीन मुलींचे बाबा असता…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, बाबांनी आयुष्यभर केलेला त्याग, प्रेम, कष्ट लक्षात घेऊन, त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी आणि त्यांच्या मनात असणारे बाबांविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तीन मुलींनी दिलबरो या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. गाण्यातील प्रत्येक ओळ ऐकून बाबासुद्धा भारावून जाऊन, भावूक होताना दिसत आहेत. डान्स परफॉर्मन्सच्या अगदी शेवटी बाबा आणि आईने तिन्ही मुलींना फ्लाईंग किस दिली आणि टाळ्या वाजवीत त्यांचे कौतुकदेखील केले.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tims_island या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कोण म्हणतं मुली ओझं असतात, कोणीतरी आम्हाला येऊन विचारावं आम्ही त्यांच्यासाठी नक्की काय असतो ते’, अशी हृदयस्पर्शी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि ‘असे वडील आपल्या मुलींना एखाद्या राणीप्रमाणे सांभाळतात’ , ‘जेव्हा तुम्ही तीन मुलींचे बाबा असतात’, ‘मुलींच्या आयुष्यातील पहिला हीरो’ असे सांगत अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

Story img Loader