Viral Video Shows Delivery Partner Eats Customer’s Food : आजकाल अनेक ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्या आहेत ; ज्या ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ऑर्डर केलेला एखादा पदार्थ झटपट तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम या प्रसिद्ध कंपन्या करत असतात. केकपासून ते जेवणापर्यंत तुम्ही या ॲपवरून अनेक पदार्थ मागवू शकता आणि घरबसल्या या पदार्थांचा भरपूर आनंद घेऊ शकता. पण, तुम्ही काही दिवसांपासून पाहिलं असेल की, ऑनलाईन पदार्थांमध्ये विचित्र गोष्टी टाकलेल्या आढळून येत आहेत. पण, आज तर हद्दच पार झाली आहे. एक डिलिव्हरी बॉय ग्राहकाची ऑर्डर त्याच्यासमोर खाताना आणि दादागिरी करताना दिसला आहे.
दिल्लीत राहणाऱ्या अमन जैस्वाल नावाच्या एका माणसाबरोबर एक धक्कादायक घटना घडली. ज्याने फ्रेंच फ्राईज ऑनलाई ऑर्डर केले होते. पण, डिलिव्हरी बॉयने सुरवातीला पार्सल घेऊन येण्यासाठी अतिरिक्त दहा रुपये मागितले. अनेकदा ही अट नाकारून शेवटी माणसाने त्यांचे ऐकण्यास तयार झाला. पण, या नंतर तर डिलिव्हरी बॉयने हद्दच पार केली. त्या दोन्ही डिलिव्हरी बॉयने उद्योजकाला जवळजवळ ४५ मिनिटे वाट पाहायला लावली. त्यानंतर जे घडलं ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा …
व्हिडीओ नक्की बघा…
डिलिव्हरी बॉयची अजब दादागिरी:
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ४५ मिनिटे वाट बघायला लावून डिलिव्हरी बॉय भलतीच कृती करताना दिसले आहेत. ऑनलाईन फ्रेंच फ्राईजची ऑर्डर देणारा माणूस त्याच्या घराखाली येतो तेव्हा त्याला समजते की, दोन डिलिव्हरी बॉय घटनास्थळी पोहचले तर आहेत. पण, ते स्वतः फ्रेंच फ्राईज खात असल्याचे आढळले आहे. अमन जैस्वाल त्यांना असं करण्यापासून थांबवतात आणि म्हणतात की, ‘ हे माझे फ्राईज आहेत ; जे तुम्ही खात आहात’. तेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणतो ‘तुम्हाला जे करायचं आहे ते करा’ आम्ही तुम्हाला तुमची ऑर्डर देणार नाही ; असे म्हणताना दिसत आहे.
जयस्वाल यांनी या घटनेचे संपूर्ण शूटिंग त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलं आहे आणि हा व्हिडीओ @amanbjaiswal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आपला व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला जातो आहे हे पाहून सुद्धा डिलिव्हरी पार्टनरची निष्काळजीपणाची वृत्ती कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. तसेच जयस्वाल यांनी फ्रेंच फ्राईजसाठी त्यांनी ऑनलाईन पेमेंट सुद्धा केले होते ; ते सुद्धा त्यांना परत करण्यात आलेलं नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ‘ओला’ कंपनीने ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी त्यांचे ‘ओला कॅफे’ लाँच केले. तर याच ‘ओला कॅफे’च्या फूड डिलिव्हर करणाऱ्या दोन माणसांनी असे कृत्य केलं आहे असे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे