Viral Video Shows Son Surprised His Mom On Diwali : दिवाळीत बोनस किंवा पगार लवकर व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, कारण या पैशातून दिवाळीत घरच्यांना गिफ्ट किंवा एखादी घरी उपयोगी पडेल अशी वस्तू घ्यायची असते. आईला साडी, लहान भावा-बहिणीला फटाके, तर बाबांना कुर्ता आदी अनेक गोष्टी आपण दिवाळीत घरच्यांसाठी अगदी हक्काने विकत घेतो; तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लेकाने त्याच्या आईला दिवाळीनिमित्त भेटवस्तू दिली आहे. नक्की लेकाने काय दिलं आहे जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) बंगळुरूचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आई सोफ्यावर बसलेली दिसते आहे. लेक आईला डोळे बंद करून हात पुढे करून बसण्यास सांगतो. तेव्हा लेक पॅकिंग केलेली एक वस्तू आईच्या हातात आणून ठेवतो. जेव्हा आई पॅकिंग केलेली भेटवस्तू उघडते तेव्हा फोनचा बॉक्स पाहून तिला आश्चर्य वाटते. पण, जेव्हा हा फोनचा बॉक्स उघडते तेव्हा नक्की त्यात कोणता फोन असतो ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…असे मित्र कुठे भेटतात यार? मैत्रिणीला वाढदिवसाला दिलं असं सरप्राईज की… VIRAL VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा…

म्हणून, या दिवाळीत मी तिला आयफोन १५ गिफ्ट करायचं ठरवलं…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, लेकाने आईला गिफ्ट केलेला फोन सॅमसंग, विवो नसून आयफोन असतो. हे पाहून आईला खूप जास्त आश्चर्य वाटते. ती आयफोन पाहिल्यावर सोफ्यावरून उठते आणि लेकाला मिठी मारते. आई चार वर्षांपासून तिचा फोन वापरत होती, त्यामुळे लेकाने या दिवाळीला तिला नवीन आयफोन गिफ्ट देण्याचे ठरवले. आईच्या चेहऱ्यावर हसू पाहून मुलाच्याही डोळ्यात अश्रू दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @duttasomrattwt या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच युजर सोमरत दत्ता म्हणजेच आईच्या लेकाने, “मला जवळजवळ अश्रू अनावर झाले! आई तिचा जुना रेडमी फोन गेल्या चार वर्षांपासून वापरत होती… म्हणून, या दिवाळीत मी तिला आयफोन १५ गिफ्ट करायचं ठरवलं. मी नेहमी अशा दिवसासाठी प्रार्थना करत होतो, जेव्हा मी तिला आयफोन गिफ्ट करू शकेन; अखेर तो दिवस आज आला”, अशी कॅप्शन त्यानी व्हिडीओला दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows diwali special gift man surprised his mom with an iphone 15 watch her reaction asp