Viral Video Shows Dog Help Women : श्वान हा माणसाचा अगदी जवळचा मित्र आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण- माणसांची श्वानाबरोबर पटकन मैत्री होते. त्यामुळे कुटुंबातील एक सदस्य बनवून श्वानांना घरी आणले जाते. माणूस-श्वान यांच्यातील परस्पर नात्यामुळेच हा जिव्हाळा निर्माण होऊ लागला आहे. तुम्ही भटक्या श्वानाला एके दिवशी दूध, बिस्कीट जरी खाऊ घातलंत तरी दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तो तुमची आतुरतेने वाट पाहत उभा राहील. तर आज सोशल मीडियावर श्वानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत एका तरुणीचे एक श्वान दुसऱ्या भटक्या श्वानापासून संरक्षण करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, रस्त्याकडेला एक तरुणी भिंतीला टेकून उभी असते. तिच्या पायाजवळ एक भटका श्वान उभा असतो. या दोघांसमोर थोड्या अंतरावर एक दुसरा काळ्या रंगाचा भटका श्वान उभा असतो. बहुतेक काळ्या रंगाचा दुसरा श्वान भिंतीला टेकून उभ्या असलेल्या तरुणीला त्रास देत असतो. म्हणून पहिला श्वान तरुणीच्या रक्षण करण्याचे प्रयत्न करतो. नक्की श्वान काय करतो ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…ढिगाऱ्याखाली अडकली चिमुकली, मदतीची करतेय याचना; हृदय पिळवटून टाकणाऱ्या VIRAL VIDEO मुळे उडाली खळबळ, पण सत्य काय? वाचा

व्हिडीओ नक्की बघा…

दोस्त असावा तर असा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, एक श्वान तरुणीबरोबर उभा असतो आणि दुसरा श्वान थोड्या अंतरावर उभा असतो. दुसरा श्वान बहुतेक तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पहिला श्वान तरुणीच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि दुसऱ्या श्वानाकडे रागाने बघून त्याच्याकडे बघून भुंकतो. दोन्ही श्वान एकमेकांकडे बघत असतात. अनोळखी श्वान दुसऱ्या श्वानापासून आपले संरक्षण करतो आहे, हे पाहून तरुणीला कौतुक वाटते आणि ती आश्चर्य व्यक्त करताना व्हिडीओमध्ये दिसून आली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @manaswini.k.ram या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पण, नेटकरी मात्र या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, श्वान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तरुणीच्या पायाशेजारी उभा आहे. तर, अनेक जण तो तरुणीचे संरक्षण करण्यासाठी उभा आहे, असे म्हणताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर श्वानाच्या या कामगिरीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. कारण- संकटात असलेल्या एखाद्या मित्राची मदत कशी करावी याचे उत्तम उदाहरण आज या श्वानाने दाखवले आहे.