Viral Video Shows Dog Puts Life On The Line To Save Man : रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद, शांती मिळविण्यासाठी धडपडत असतो. त्यामुळे काही जण घरात प्राणी पाळतात. त्यामध्ये विशेषतः श्वान, मांजर, पोपट या प्राण्यांचा समावेश असतो. हे प्राणी, पक्षी मनोरंजबरोबर आपले संरक्षण करण्यातही हातभार लावतात. या सगळ्यात श्वान हा सगळ्यात इमानदार प्राणी मानला जातो; जो आपल्या मालकाच्या मदतीसाठी वेळप्रसंगी स्वतचा जीव धोक्यात घालायलाही मागे-पुढे पाहत नाही. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video ) होत आहे; ज्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती श्वानाच्या मालकाला पाण्यात ढकलते. तेव्हा श्वान मालकाच्या मदतीसाठी धावून जातो.
व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला अनोळखी व्यक्ती श्वानमालकाला छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये ढकलते. मालक पाण्यात बुडतोय, असे मुद्दाम नाटक करू लागतो. हे पाहिल्यावर पहिल्या मजल्यावर बसलेला श्वान भुंकू लागतो. त्याला काय करावे ते सुचत नसते. शेवटी तो पहिल्या मजल्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतो. शिड्यांवरून तो धावत-पळत खाली उतरतो आणि मालकाकडे जातो. बघता बघता तो पुढे काय करतो ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा..
व्हिडीओ नक्की बघा…
जीवाची पर्वा न करता, पाण्यात घेतली उडी :
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, मालकाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी श्वान खाली उतरतो. आजूबाजूला कोण मदतीला आहे का हेसुद्धा पाहतो. शेवटी श्वान पाण्यात उडी मारतो आणि पोहत पोहत मालकाजवळ पोहोचतो. मालकाला वाचवण्यासाठी तो कोणतीही कसर सोडत नाही. अखेर तो श्वान मालकाला त्या छोट्याशा स्विमिंग पुलाच्या कडेला नेऊन सुखरूप बाहेर काढतो. अशा प्रकारे श्वान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पाण्यात उडी घेऊन मालकाला मदत करतो; जी खरोखरच कौतुकास्पद घटना आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘श्वान मदत करण्यासाठी येतो की नाही हे पाहण्यासाठी छोटं मजेशीर नाटक’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या मुक्या प्राण्याने परिस्थिती समजून घेऊन, मालकाला मदत केली आहे आणि मालकाच्या या छोट्याशा प्रँकमध्ये तो यशस्वी झाला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून श्वानाचे भरभरून कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.