मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे आहे. प्रचंड गर्दी, नियमांचे उल्लंघन, धक्का-बुक्की करणारे प्रवासी आणि त्यांचा बेशिस्तपणा हेच चित्र मुंबई लोकलमध्ये पाहायला मिळते. दरम्यान मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या भटक्या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे माणस बेशिस्तपणे नियमांचे उल्लंघन करत प्रवास करताना दिसतात तिथेदुसरीकडे हा कुत्रा मात्र नियमांचे पालन करत प्रवास करताना दिसत आहे. कुत्र्याच्या व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर नेटकऱ्यांचे मने जिंकले आहे. व्हिडीओ पाहून पाहून नेटकरी संतापले आहे. एक प्रवासी कुत्र्यावर ओरडून त्याला चालत्या ट्रेनमधून उडी मारण्यास भाग पाडत होता हे पाहून अनेकांना नेटकरी संतापले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की एक भटका कुत्रा रेल्वेच्या डब्यात चढला आहे. काही प्रवासी कुत्र्याला रेल्वेतून बाहेर जाण्यास सांगत आहेत. काही जण त्याच्यावर ओरडून त्याला चालत्या रेल्वेतून उडी मारण्यास भाग पाडत आहे पण कुत्रा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे रेल्वे थांबण्याची वाट पाहतो. जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित थांबते त्यानंतर कुत्रा ट्रेनमधून बाहेर पडतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर अनेक प्रतिसाद मिळाले आहेत आणि अनेक नेटिझन्सने शिस्तप्रिय कुत्र्याचे कौतुक केले आहे. त्याचवेळी प्राण्यावर ओरडणारे प्रवासी नेटकऱ्यांच्या रोष व्यक्त केला.
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या भटक्या कुत्र्याच्या व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर मने जिंकली आहेत. पण, नेटिझन्सना ज्या गोष्टीचा राग आला तो प्रवाशांचे असभ्य वर्तन होता पण कुत्र्याच्या शिस्तप्रिय वागण्याचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे.
हेही वाचा – YouTuber संजू टेकीने कारमध्ये बनवला स्विमिंग पूल अन् भररस्त्यात झाल असं काही, Viral Video बघाच
“एका कुत्र्याला ट्रेन थांबल्यावरच खाली उतरण्याची शिष्टाचार आहे,” पोस्टवर एका रेडिट वापरकर्त्याने कमेंट केली.
“तो कुत्रा अनेक मुंबईकरांपेक्षा हुशार आहे,” असे आणखी एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले.
दुसऱ्या वापरकर्त्याने प्राण्याचे कौतुक केले आणि लिहिले, “कुत्र्याला माहिती आहे चालत्या ट्रेनामधून उतरणे धोकादायक आहे. त्यांना हे माणसांपेक्षा चांगले समजते..हुशार आहे”
मुंबई लोकल प्रवाशांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी व्हायरल व्हिडिओ वापरण्याची सूचना करताना एका रेडिट वापरकर्त्याने लिहिले की, “मुंबई लोकलने हा व्हिडिओ लोकांना धावत्या ट्रेनमधून उतरू नका हे सांगण्यासाठी जाहिरात म्हणून वापरावा.”
दुसऱ्या वापरकर्त्याने त्याचा रेल्वे प्रवास आठवला जिथे तो हाच कुत्र्या दिसला होता. कुत्र्याबरोबरच्या त्याच्या आठवणी जपत, वापरकर्त्याने लिहिले, “यार मी हा व्हिडिओ पाहिला आणि खूप उत्साही झालो कारण जेव्हा मी एकदा ट्रेनमध्ये चढलो होतो तेव्हा मी त्याला पाहिले होते. मी कुत्र्याला लगेच ओळखले. मी कुत्र्याचा व्हिडिओ शोधण्यात चांगली १० मिनिटे घालवली (हे सर्व ऑक्टोबरमध्ये घडले होते), फक्त हे लक्षात आले की तुम्ही कमेंटमध्ये व्हिडिओ जोडू शकत नाही:(( असो तो कदाचित सर्वात आनंदी ट्रेनचा प्रवास होता.”