Viral Video Shows Women Singing Mere Humsafar Song During Antakshari : चित्रपटातील गाणी हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. एवढ्या वर्षांत वेगवेगळ्या प्रकारची गाणी प्रसिद्ध झाली आहेत की, तुमच्या फोटोला गाणं लावायचं असो किंवा कार्यक्रमात डान्स करण्यासाठी एखादं परफेक्ट गाणं शोधायचं असो, ते तुम्हाला नक्कीच सापडेल. अंताक्षरी खेळाचचं बघा ना… या खेळात मराठी, हिंदी असो किंवा इंग्रजी गाणी तुम्हाला गायचं असेल तर प्रत्येक अक्षरावरून तुम्हाला एखादं तरी गाणं नक्कीच सापडेल. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये म अक्षरावरून तरुणीने गायलेल्या गाण्याचं कौतुक होत आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, अंताक्षरी खेळताना ‘म’ अक्षर आलं की, आपण ‘मैय्या यशोदा’ हे गाणं हमखास म्हणतो. तर व्हायरल व्हिडीओतसुद्धा (Viral Video) हा खेळ सुरू असतो. गेममध्ये यामी पुरी नावाच्या तरुणीचे गाणं गाण्याची टर्न असते. तेव्हा तिला म अक्षरावरून गाणं गाण्यास सांगितले जाते. तिला गाणं आठवत नसते, काही सेकंद झाल्यानंतर फ्रेंड्स वन, टू, थ्री असं बोलायला लागतात. तितक्यात तरुणीला बॉलीवूडच्या क्लासिक चित्रपट रेफ्युजीमधील एक गाणं आठवतं. तरुणीने कोणतं गाणं गायलं, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा…वाह, मालकाची कमाल! पाळीव श्वानांना प्रवासात नेण्यासाठी केला जुगाड; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या

व्हिडीओ नक्की बघा…

जेव्हा तुम्हाला अंताक्षरीत कोणीच हरवू शकत नाही

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, म अक्षरावरून ‘मैय्या यशोदा’ हे गाणं न गाता तरुणी बॉलीवूडच्या क्लासिक चित्रपट रेफ्युजीमधील ‘मेरे हमसफर’ गाणं गाते. यामी तिच्या मित्रांना हे गाणं गाऊन मंत्रमुग्ध करताना दिसते. कोणत्याही वाद्याची मदत न घेता तिने हे गाणं गायलं आहे याचे आश्चर्य तर आहेच, पण तिने गायलेले गाण्याचे बोल, गाणं गाताना तिचे हावभाव, तिचा ताल-सूर अगदी पाहण्यासारखा आहे. तिचं गाणं गाऊन झाल्यावर तिचा मित्र हिंदीमध्ये म्हणतो, ‘चरण कहां हैं तुम्हारे’ (पाय कुठे आहेत तुझे), तर दुसरा मित्र म्हणतो, ‘हे बरोबर नाही, मला यापुढे खेळायचे नाही’ ; असं बोलू लागतात आणि तिला अंताक्षरीत हरवता न आल्याचं दुःख व्यक्त करतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @yami_puri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुम्हाला अंताक्षरीत कोणीच हरवू शकत नाही’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हे गाणं ऐकल्यानंतर नेटकरीसुद्धा तरुणीचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी एक आनंददायक क्षण बनला, कारण एखाद्या व्यक्तीचा सुंदर आवाज आणि बॉलीवूडमधील क्लासिक गाणी हे अंताक्षरी खेळासाठी परफेक्ट संयोजन आहे.

Story img Loader