Viral Video Of Gulabi Sadi Song : जोडीदार कसा असावा? हे जर आपल्याला कोणी विचारले, तर इच्छा-अपेक्षांची एक यादी तयार असते. पण, काही जणांच्या जोडीदाराकडून काही विशेष अपेक्षा नसतात; फक्त तो प्रत्येक सुख-दुःखात साथ देणारा आणि विश्वासू असावा, एवढीच अपेक्षा असते. पण, असे असले तरीही थोडासा खेळकर स्वभाव, आपल्या मनातले विचार ओळखणारा, घरकामात मदत करणारा, डान्स करता येत नसेल तरी हातात हात घेऊन तो क्षण अगदी खास करणारा एक जोडीदार प्रत्येकालाच हवा असतो आणि हा स्वभाव अगदी म्हातारपणापर्यंत राहावा, असेही कुठेतरी वाटत असते. आज सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा (आजी-आजोबांचा) व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

‘गुलाबी साडी’ हे गाणे आपल्यातील प्रत्येकाने ऐकलेच असेल. या गाण्याने भारतातच नाही, तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावले आहे. अगदी सामान्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनादेखील या गाण्याची भुरळ पडलीय. आज एक आजी-आजोबा दाम्पत्यही याच गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले आहेत. व्हिडीओत लग्न समारंभ सुरू असतो. त्यादरम्यान या दोघांनी ‘गुलाबी साडी’ गाण्यावर जबरदस्त हावभाव दाखवीत डान्स केला आहे. या जोडप्याचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा (Viral Video) …

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा…VIRAL VIDEO : त्याला कळलं असेल का? पुण्यातून शिफ्ट होताना पोपटाने घेतला तिचा निरोप, मिठू-राधिकाची मैत्री सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा…

दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, एका वृद्ध जोडप्याने ‘गुलाबी साडी’ गाण्यावर जबरदस्त हावभाव व्यक्त करीत डान्स केला आहे. गाण्यातील प्रत्येक ओळीवर जोडप्याच्या स्टेप्स, त्यांचे हावभाव, दोघांचा निरागसपणा अगदी बघण्यासारखा आहे. त्याचबरोबर व्हिडीओच्या शेवटी ‘दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ या गाण्याच्या ओळीवर आजीने पोज दिल्याचे आणि आजोबांनी फोटो काढल्याचे दिसते. ते पाहून हा व्हिडीओ तुमचेही मन जिंकून घेईल एवढं तर नक्कीच. डान्सची आवड, त्यांचा उत्साह पाहून मग तुम्हीही त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kritikaneel_ आणि @weddingsmedia.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या जोडप्यातील आजीचे नाव निशा, तर आजोबांचे नाव शरद आहे. नेटकरीसुद्धा हा जबरदस्त डान्स पाहून वेगवेगळ्या शब्दांत त्यांचे कौतुक करीत आहेत. इंटरनेटचे बिल आम्ही असे व्हिडीओ बघण्यासाठी भरतो; लय भारी, खूप प्रेम, हे गाणे त्यांच्यासाठीच बनले आहे, अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader