Viral Video Of Elderly Couple : ‘जुनं ते सोनं’, असं बऱ्याचदा आपण म्हणतो. कारण- आपण कितीही मॉडर्न काळात वावरत असलो तरीही तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलं असेल की, ९० च्या दशकातील अशा बऱ्याच गोष्टी, वस्तू, गाणी, कपड्यांची स्टाईल आदी गोष्टी आपण सगळेच सध्याच्या मॉडर्न काळात ट्रेंड म्हणून वापरत आहोत. तर ‘पेईंग गेस्ट’ या चित्रपटातील ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’ हे एव्हरग्रीन गाणेही आजही तितकेच प्रसिद्ध आहे. तर, आज याच गाण्यावर तरुणांना लाजवेल असा डान्स वृद्ध जोडप्याने केला आहे.
‘छोड दो ऑंचल जमाना क्या कहेगा’ या सदाबहार बॉलीवूड गाण्यावर नाचणाऱ्या एका वृद्ध जोडप्याच्या एका गोंडस व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कोरिओग्राफर एका कार्यक्रमासाठी आजी-आजोबांना डान्स शिकवत असते. त्त्यादरम्यान एक प्रॅक्टिस करतानाचा आजी-आजोबांचा व्हिडीओ तिने शूट केला. आजी पदर पकडायला सांगून, हावभाव देत डान्स करण्यास सुरुवात करते. तसेच आजोबासुद्धा आजीला साथ देतात. आजी-आजोबांचा डान्स व्हिडीओ एकदा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
‘एवढ्या प्रेमळ जोडीला कोणाची नजर ना लागुदेत (Viral Video) :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, एका वृद्ध जोडप्याने ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’ गाण्यावर जबरदस्त हावभाव व्यक्त करीत डान्स केला आहे. गाण्यातील प्रत्येक ओळीवर जोडप्याच्या स्टेप्स, त्यांचे हावभाव, दोघांचा निरागसपणा अगदी बघण्यासारखा आहे. आजी-आजोबांचा या वयातला उत्साह, त्यांनी डान्स करण्याची स्टाईल, गाण्याला जुळेल असा त्यांचा हुबेहूब नाचण्याचा प्रयत्न अगदी बघण्याजोगा आहे, जो तुम्हाला व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघण्याची इच्छा नक्कीच व्यक्त करील.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shweta_pancholi_12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘प्रेमाची खरी झलक… जेव्हा आजी-आजोबांनी डान्स फ्लोअरवर त्यांची जादू पसरवली. माझी कोरिओग्राफी आणि त्यांचे प्रेम’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “आजी-आजोबांचा चेहरा अगदी सारखाच दिसतो आहे”, “आजीच्या डान्स स्टेप्स आणि हावभावांनी तर मन जिंकले”, “एवढ्या प्रेमळ जोडीला कोणाची नजर ना लागू देत” आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.