Viral Video : आजकाल घरबसल्या अनेक जण छोटे-मोठे व्यवसाय सुरू करून पैसे कमावण्यास सुरुवात करू लागले आहेत. सातत्यानं वाढत असलेल्या महागाईमुळे अनेक जण जॉबव्यतिरिक्त अधिक पैसे कमावण्याचा विचार करीत असतात. घरच्या घरी कपडे शिवणे, केक बनविणे, नाश्त्याचे खाद्यपदार्थ विकणे आदी व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात असतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये एका आजी-आजोबा जोडप्याचा खास व्यवसाय दाखविण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ (viral Video) कर्नाटकातील उडुपी येथील आहे. ८० वर्षांहून अधिक वय असणारे आजी-आजोबांचे हे जोडपे अनेक वर्षांपासून त्यांचे छोटेसे हॉटेल चालवत आहे. या हॉटेलमध्ये लोकांना पोटभर जेवण दिले जाते, तेही फक्त ५० रुपयांमध्ये. येथे जेवण वाढायला केळीची पाने दिली जातात. खास गोष्ट अशी की, हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना स्वतःच्या हाताने जेवण वाढतात. या जेवणात भात, भात, डाळी, दही, लोणची, कोशिंबीर आदी पदार्थ लोकांना खाऊ घालतात. वृद्ध जोडप्याचे हे खास हॉटेल व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…Viral Post : ‘तुमचा अ‍ॅटिटय़ूड खिशात…’ प्रवाशांसाठी कॅब चालकाचं पोस्टर, नियमांची यादी वाचून व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा…

हॉटेलमध्ये ग्राहकांना स्वतःच्या हाताने जेवण वाढतात…

व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, आजी-आजोबांच्या या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी दिसते आहे. टेबलावर केळीची पाने ठेवून त्यात प्रत्येक ग्राहकाला प्रेमाने वाढत आहेत. सांगण्यात येत आहे की, आजी-आजोबा हे हॉटेल १९५१ पासून चालवीत आहेत. या व्हिडीओला ‘८० च्या दशकातील हे वृद्ध जोडपे ५० रुपयांमध्ये अमर्यादित घरगुती अन्न विकतात’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. एकूणच या वयात आराम करण्याचे दिवस असणारे आजी-आजोबा कष्टाने इतरांना जेवण खाऊ घालत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @VisitUdupi एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या जोडप्याचे कौतुक करीत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, देव त्यांना आशीर्वाद देत राहो. तर दुसरा म्हणतोय की, सडलेले अन्न जास्त किमतीत विकण्याच्या जमान्यात कमी किमतीत दर्जेदार अन्न देणारे फार कमी लोक आहेत. तर तिसरा युजर म्हणतोय की, हा देवाचा खरा सेवक आहे आदी अनेक कौतुकास्पद कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.